मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
ऊँकार विवरण

आदिखंड - ऊँकार विवरण

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


असा हा प्रणवबोधु । तुज सांगितला एवं बिधु । हा नाना मतां बालबोधु । कारण होये ॥६३॥
समस्तां घरिची पकान्नें । एकें ठाई पाहानें । तरि घेईंजे वाणें । ग्रामदेवतेचें ॥६४॥
जे जें पीके सेतीं । तें ते गांवखळां येती । कीं सर्व तीर्थें जोडती । समुद्रस्नानें ॥६५॥
समस्तां वानाची गिवसणी । कीजे गांधियाचें दुकानि । किं राष्ट्रद्रव्याची मेळवणी । राजगृहि ॥६६॥
तेवि नाना ग्रंथिची दूहनें । बहुतांची गुरु ज्ञानें । प्रमाणासी प्रमाणें । वेचूनि घेतलीं ॥६७॥
वरी ईश्वर ज्ञानदाता । चामुंडेची प्रसन्नता । एवं या बुध्दि ग्रंथा । माजी आणूं ॥६८॥
कासया सतें ढांडोळावी । नानाशास्त्रें का पाहावीं । यं सर्वाची उगवे गोवी । बाळबोधीं ॥६९॥
हें श्रोतया उजळन । ब्रह्मीष्टां चेतवन । मूर्खबुध्दि नागवण । बाळबोधु हा ॥७०॥
यास्तव विप्रें त्रिंबके । बोलिजति पदे सुरसिकें । जेणें उध्दरति सकळैकें । शिष्यकुळें ॥७१॥
इतिश्री चिदादित्ये प्रकाशे श्रीमव्दाळावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदें अदिखंडे विवरणें ऊँकार विवरण नाम अष्टकथन मिति ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP