आदिखंड - शरीरनिर्धार
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
आतां अवस्छाचें ज्ञान । करुं तुज निरुपण । अचळ धातु पाषाण । येथे अवस्छा काई ॥२३॥
वनस्पती समस्ता । यासी सुषुप्ती अवस्छा । अज्ञान कारण बेवस्ता । येथें दीसे ॥२४॥
यासी क्षय वृध्दि असणें । परी तें सुखदु:ख रिपु मित्र नेणें । यास्तव सुषुप्ती अज्ञानें । असिजे येथें ॥२५॥
चक्षु श्रोत्र जिव्हा घ्राण । ज्यां जीवां अर्पमाण । त्यासी अवस्था ह्मणतां माझें मन । साक्षि नेदि गा ॥२६॥
परि आहारापुरती । तेथ असावी जागृती । कां जे शुध्दें जागना वस्ति । नेत्री असे ॥२७॥
मानवी देहा वाचुन । ज्यासी देखसी नयन । अवस्था त्रयाचें ज्ञान । त्यांचा ठाई ॥२८॥
ते निष्कळ अविद्येचे घडिलें । यास्तव तुरीयेसी वंचले । जे मुख्य हेतु सांडावले । त्या ज्ञप्ति कैचीं ॥२९॥
आतां आईक सुरगण । यासी अवस्छा दोनी कारण । जागृति तुरीया प्रमाण । आलिया तेथें ॥३०॥
जेंथ नाहि चक्षुमिळन । तेथे कैचें सुषुप्ती स्वप्र । अज्ञान अथवा विपरीत ज्ञान । असेचि ना ॥३१॥
ज्यांसी व्यापारु जागृती । तुरीयां त्याची विश्रांती । विवर्जितस्वप्रसुषुप्ति । नांदति ते ॥३२॥
अन्य जीव आणि देव । या उभयांचे भाव । हे देखावे सर्व । नराचां योनी ॥३३॥
या मनुष्याचां देहिं । सर्व ही अवस्था पाहीं । आतां सविस्तर या देहिं । विवंचना करुं ॥३४॥
थूळिं अवस्था जागृति । अभिमानी विश्व प्रजापति । अकारु चरणु वस्ति । नेत्रस्थानीं ॥३५॥
स्थूळ भोगु रजो गुणु । हा प्रणवाचा एकु चरणु । थूळा जागृति वाचुनु । रुप नाहीं ॥३६॥
तैं शोक मोहादिकें । थूळाचिं पांच पचके । ये व्यापारति सकळैकें । जागृति संगें ॥३७॥
विषय पंचक दशेंद्रिय जाण । अंत:करण पंचक पंचप्राण । ये पंचवीस ही सचेतन । ते जागनावस्था ॥३८॥
जेथ तैजसु अभिमानी । उकारु मातृका कंठस्थानीं । विष्णु देव सत्वगुणी । वर्त्ते सदा ॥३९॥
यें सर्वंत्रे मिळोनु । प्रणवाचा दुसरा चरणु । कंठी आसन घालुनु । स्वप्र दाविति ॥४०॥
पंच विषय पंचप्राण । अंत :करणादि तत्त्वें सचेतन । येर दश इंद्रियें होति लिन । ते स्वप्रावस्था ॥४१॥
स्वप्र अवस्थेचां भरीं । इंद्रियें सांडोनि निदसुरी । अंत:करण पंचक निघे ब्यापारीं । विषयांसहित ॥४२॥
अंत:करणी विषय भरे । तें भोगावें निर्धारे । थूळ सांडोनि निदसुरे । विचरे ते स्वप्र ॥४३॥
लिंग देहाचें सूत्रें । चळति गात्रें । सुख दु: खे सर्वत्रें । लिंगाधारें ॥४४॥
वासनेचें आधारें । आपण चि होय दूसरें । पाठिं स्वप्र विकारे । खेळो लागे ॥४५॥
श्रोत्र वाचेसी कारण। ते आईके बोले अंत:करण । त्वचे कराचे मन । ब्यापारु करी ॥४६॥
जे श्रेष्ठ चक्षु पादि । ते पाहे चाले बुध्दि । चित्त जिव्हे शिश्नादि । स्वाद मैथुनें वर्ते ॥४७॥
जो घ्राण गुदा आधारु । तो गंधमळातें करी अहंकारु । स्वप्रिं इंद्रियां व्यापारु । येणें सूत्रें ॥४८॥
हे सर्व ही जाण । येका लिंगदेहाचे गुण थूळ असे अचेतन । तेथ जागें कीजे विषयीं ॥४९॥
आतां असो हें स्वप्रं । सांगो सुषुप्तीचें लक्षण । जेथ अधीकारी कारण । अज्ञान देह ॥५०॥
तेथ अभिमानी प्राज्ञु । आनंद भोगु तमो गुण । मकारु तृतीय चरणु । रुद्र रुपी ॥५१॥
जेव्हां ये हॄदयीं मिळती । तेव्हां जीवु भरे सुषुप्ती । वे विश्रांती समस्ति । लीन होणें ॥५२॥
तेव्हा कर्म इंद्रिये ज्ञान इंद्रियें । अंत:करणादिक पंच विषयें ख। यां सर्वा विश्रांति होय । प्राण व्यापारु चाले ॥५३॥
पांच ही भूतें पंचप्राण । हें सुषुप्ती सचेतन । जागृती होवावयासी कारण । वायो चि तेथें ॥५४॥
पंचप्राण जाति लया । ते समाधी तुरीया । तेथ चहुं अवथाचा लयो । देह नाश महाप्रळयो । यातें बोलिजे ॥५६॥
असो त्या मृत्याची गति । अदृष्ट न बोलिजे वित्पत्ति । मुख्य तुरीयेची स्थिति । सांगो आतां ॥५७॥
ते देह महाकारण जाणिसु । भोग तरी आनंदाभासु । प्रत्यगात्म अभीमानी वासु । मूघ्रि असे ॥५८॥
जेथ अवस्थात्रय हारपति । देहव्रय लोपती । अभिमानी सांडिती । हेतु जेथे ॥५९॥
जेथ नसे त्रय स्थान । लीन होति तिन्हि चरण । त्रिशक्ति देव तीन । उपरु नेघती ॥६०॥
गुणत्रयें तिन्हि भोगु । नुरती याचे संयोग । ते अर्ध्दमात्रा ब्रह्म चांग । तुरीयावस्था ॥६१॥
जेथ स्वयं ब्रह्म लक्षण । सप्रेमता । तरी गहन । तें तुरीयेचें ज्ञान । वस्तु सर्व ॥६२॥
जेथ हेतु पलपे । मिं ब्रह्म हें हारपे । ते तुरीय़ा अरुपे उन्मनी होय ॥६३॥
॥इति अवस्छाज्ञान ॥
असे अवस्थाचें ज्ञान । आह्मीं केले निरुपण । कां जें पूर्विल विव्दज्जन । हें चि बोलिलें ॥६४॥
जो ब्रह्मीष्ठां शिरोमणी । जगद्रुरु शुळपाणी । या देवाची हे वाणी । त्रिंबकु ह्मणे ॥६५॥
इति श्री चिदादित्ये प्रकाशे श्री मव्दालावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे आदिखंडे शरीरनिर्धार नाम व्दादश कथनमिति ॥१२॥
N/A
References : N/A
Last Updated : March 07, 2018
TOP