मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
मातृका विवरु

आदिखंड - मातृका विवरु

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


॥अलक्षमक्षरं ब्रह्म ह्येकाने कत्ववर्जितम्‍ ॥
॥कलाशोडाशकं यत्र नास्त्येव परमार्थत:॥१॥
तवं बोले श्रीगुरु । आतां कथन असे करुं । आधिं दाखऊं विचारुं । शब्द ब्रह्माचा ॥१॥
या ऊँ काराचे आधारें । सर्वत्रीं ब्रह्म विवरे । हें ज्ञान वाटे सोपारे । पण अगाधमहिमे ॥२॥
श्रमला छायेसी जाय । तों तोचि सतानु होय । पाठि त्या सुखासी काय । प्रमाण दिसे ॥३॥
चुल्हागणीं लागे लोहे । कां तृषाक्रांतु अमृत लाहे । तवं शव्दाते पाहे । तो हें चि ब्रह्म ॥४॥
ब्रह्म तो प्रणवु रोकडा । हाचि सर्व सांतावणाचा मुडा । यरु बोल यापुडां । उपरु नेघे ॥५॥
पूर्ण वस्तू ते निर्मळ । नाम होवा वया मूळ । हा ऊँ कारु चि सकळ । ब्रह्म होय ॥६॥
पाहातां हे विश्व सर्व । प्रणवाकार प्रणवभाव । कार्यकारणां नाव । येणे केलें ॥७॥
ह्मणसी धूलाक्षरिचे धडे । ऊँ कार विश्वही पढे । परीं हे सगर्भ न घडे । तें अनारिसें ॥८॥
सबिंदुमात्रुका विवरु । नादु बिंदु सहित ऊँ कारु । क्षरु आणि अक्षरु । येथें चि पाहाणें ॥९॥
प्रकृति पुरुषें याचां पोटीं । या पासाव शब्दसृष्टि । सून्या साकाराचि भेटी । तो हा चि देव ॥१०॥
हा चिं पींडा ब्रह्मांडाचि खानि । सर्वज्ञता याचिया पासुनि । हा ब्रह्म चि ब्रह्मज्ञानि । प्रतिष्ठिती यासी ॥११॥
जो ईश्वरीं अहंता विवरु । तो हा सुश्वासु ऊँ कारु । तरि हाचि ब्रह्म साचारु । नव्है कैसा ॥१२॥
ऊँ मित्येकाक्षरं ब्रह्म । असें बोलिलें सर्वोत्तम । आणि वेदेही नेम । हा चि केला ॥१३॥
ऊँ तत्सदितिनि वचनें । यासी ब्रह्मची बोलणें । वेदें वेदांतें नारायणें । हें चि प्रतिष्ठिलें ॥१४॥
ऊँ शब्दे शुध्द वचन झ। हें निर्मळ ब्रह्म कारण । तत्‍ शब्दें परमात्मापूर्ण । ब्रह्म होय ॥१५॥
सत्‍ शब्दें शाश्वत । तें सब्रह्म साक्षात । एवं तीं अक्षरीं बीजें आदिवंत । सर्वाचें सार ॥१६॥
गुह्य विषईं कारण । हें शब्दत्रय भर्वसेन । सर्व बीजां सांटवण । हें चि असे ॥१७॥
यास्तव भर्वसेनि । तुं ऊँकारु चि ब्रह्म मानि । हें चि गुह्य घेउनि । ज्ञाते असती ॥१८॥
हा चि या विश्वाचा बापु । विश्वात्मकु विश्वरुपु । हा विस्तारला विक्षेपु । नवलगतां सर्व ॥१९॥
याचा तीं चरणीं । पींड ब्रह्मांड खानी । प्रमाणु तेहीं या वाचुनु । रुपानये ॥२०॥
या देवाचे तीन चरण । येकें येकें पदीं देहें तीन तीन । चौथा पूर्ण ह्मणौन । देह द्शम ॥२१॥
याचा चि तिं चरणीं साचु । उठीला व्दिविध प्रपंचु । उत्पत्तिस्थितिवेचु । तेथें चि सर्वा ॥२२॥
ब्रह्म विष्णु शंकरु । चौथा देवो सर्वेश्वरु । तेही याचा चि पाईं हा निर्धारु । सत्यामानी ॥२३॥
मुख्य याच्या तिनि मात्रा । प्रसवल्या अक्षरां सर्वत्रा । वेदशास्त्र मंत्रा । हें चि बीज ॥२४॥
सर्वा ही उँ कारु बीज । बीज मंत्रां हे चि निज । या कारणाचें काज । जल्पनादिक ॥२५॥
या पासाव निर्धारें । जालीं नेमस्तें अक्षरें । तें चि तें परस्परें । कर्दमलीये ॥२६॥
मूळीं जे शब्द उठीले । त्या शब्दां नेम जाले । समर्थ रुपा आले । आदिवेद ॥२७॥
वेदीचिं वचनें श्रुति । याचेंनि आधारें स्मृति । जें जें बोलिजे ते ते स्थिति । तेचि देवीं ॥२८॥
जें जें समर्थी बोलिलें । तें तें वर्णधर्म चालिले । जे ज्यासी भागा आले । ते त्या प्रमाण ॥२९॥
परि हा सर्व ही निर्धारु । करावया वेदचि थोरु । यागा कर्माचा विचारु । वेदीं असे ॥३०॥
सर्वा वेदुचि प्रमाण । कांहि नां वेदावांचून । तरि वेदबाह्य ते कवण । ह्मणों येती ॥३१॥
एवढा वेदु पवित्रु । तो या ऊँकाराचा पौत्रु । तरी या पुढा मंत्रु । कोण थोरु ॥३२॥
देवदेवी आदि करुनी । सर्व यांचा चरणीं । तरि देवो तो या वाचुनी । दुजा नसे ॥३३॥
आतां जे जें बोलावें वाचे । तें तें याचेचि पाईचें । तरी या वांचुनि कैचें । दुसरें ज्ञान ॥३४॥
ब्रह्म तें याचें उपाये । येणें चि ब्रह्मरुप होये । तरि या वेगळे काये । ब्रह्म असे ॥३५॥
ये ऊँकारीं सृष्टी जाली । ते सांगों वेगळालि । जे निर्धारें बोलिली । शास्त्रदिकीं ॥३६॥
ऊँकारुं अक्षरु निर्धारें । अकारु क्षरला अक्षरे । एणें नामाधिकारें । अक्षरें होति ॥३७॥
शून्य अकारु । सगुण देव अकारु । उभय मिलनी ऊँकारु । ब्रह्म होय ॥३८॥
आतां मातृका विवरु । हा हीं भला प्रकट करुं । जो जाला विस्तारु । तो सांधिजैल ॥३९॥
प्रथम चरण मकारु । ब्रह्मांडीं तामस अहंकारु । तो पिंडीं निर्धारु । तमोगुण ॥४०॥
प्रलय अवस्था सर्वेश्वरीं । उलथा सुषुप्ती ये शरीरी । उचस्थानी बाह्याकारी ।येथ हॄदयीं ॥४१॥
तेथ देव शूळपाणी । येथ प्राज्ञु अभिमानी । अनुक्रमें रुद्राणी । द्रव्य शक्ति ॥४२॥
भोग आनंद निर्धारु । उभय पक्षीं विवरु । तेथ शुध्द देह अहंकारु । येथ कारणदेह ॥४३॥
एवं व्दादश मिळोनु । प्रणवाचा आदि चरणु । व्दिधा प्रपंचीं वाटोनु । असा वत्ते ॥४४॥
उकारु दुसरा चरणु । सात्विक अहंकार सत्वगुणु । अभिमानी नारायणु । तैजसु येथें ॥४५॥
येथ स्वप्र अवस्था तेथस्थिति । नारायणी ज्ञान शक्ति । तेथ मध्यलोकी वस्ति । कंठी येथें ॥४६॥
देह ते हिरण्य गर्भु हे लिंगु । प्रमाण प्रविविक्त भोगु । येणेंसि वर्त्ते चांगु । व्दितीय चरणु ॥४७॥
अकारु तृतीय चरणु । राजस अहंकारु रजो गुणु । अभिमानी विश्वु चतुराननु । येथें तेथें ॥४८॥
तेथ अवस्था उत्पत्ति । ते चि ये शरीरीं जागृती । येथ नयन अधवस्ति। तिये ठाईं ॥४९॥
क्रिया शक्ति ब्रह्माणि । विराटस्छूळ देहें दोनि । थूळ भोगु भर्वसेनि । तृतीय चरणु ॥५०॥
एवं याचा पादत्रयीं । सर्वोत्पत्ति ये चि ठाई । व्यापारु देहव्दयीं । विचारीं तुं गा ॥५१॥
या पर श्रेष्ठता जाण । चतुर्थ मातृका गहन । माया महा कारण । देह व्दयें ॥५२॥
प्रत्यगात्मा अभिमानी । सर्वेश्वरु ते स्थानीं । तुरीया सर्व साक्षिणी दोनि । अवस्था याचि ॥५३॥
भोग अनंदावभासु । तो आदि ब्रह्म सौरसु । येथ मुर्ध्रिवासु । परेत तेथें ॥५४॥
एवं अर्ध्दमात्र विवरण । हें परमपद निर्वाण । येथिचें भोग प्रमाण । सर्वा होति ॥५५॥
हे महा प्रलयाचें घर । ज्ञान ज्ञेयाचे भांडार । सर्व सुखाचें सार । मिं ब्रह्म ते हें ॥५६॥
असो हा येवढा जगडंबरु । सर्व वोतला ऊँ कारु । यास्तव देव विश्वेश्वरु ।दुजा नव्हे ॥५७॥
जो बिंदु या शीरीं । तेथ नाहीं कळा कुसरी । परी येणें सर्वातरी । पूर्णता होय ॥५८॥
हा बिंदु तो नादु । नाहीं उभयासी भेदु । कदा हि विसंवादु । नसे यातें ॥५९॥
साकारें निराकार । निराकारें साकार । मिश्रित नव्हे तो येर । बोलनें वावो ॥६०॥
शून्ये बिंदु भेदला । जो आकारु उरला । तो सर्व ही क्षरला । मातृका जाला ॥६१॥
पुढील अर्ध मातृका । ते प्रसरवली सर्वा अंका । यास्तवा हा चि सकळिक । बीज होये ॥६२॥
॥ॐ मातृका विवरु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP