आदिखंड - दृष्टांत सप्त
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
असा हा आत्मा पूर्ण जगीं । पण जन्ममरण जीव भोगी । जेवि जळीं तरंगी । उठणें निमणें ॥३५॥
घटगर्भी जैसें । जाणें येणें आकाशें । जीवा जन्ममरण तैसें । देह संगे ॥३६॥
दीप पावका घेउनि । उठति निमति भ्रमणि । कां घृतीं घृतिकेची कणी । निमे उठे ॥३७॥
जैसें लवणाचें आकारें । जळ भ्रमे देशांतरें । तेवी देहाचें आधारें । आत्मगति ॥३८॥
एणें प्रकारें जाण । जीवासी जन्ममरण । या दृष्टांतांची खुण । बुझ असी ॥३९॥
तवं शीष्य करी विज्ञापण । जी दृष्टांत कीति काय प्रमाण । एरु ह्मणें आहाति पूर्ण । दृष्टांत सात ॥४०॥
प्रथम अक्य दृष्टांतु । दूजा सम दृष्टांतु पांचवा । सून्य दृष्टांतु । गुह्य दृष्टातु चौथा ॥४१॥
बाह्य दृष्टांत पांचवा । सून्य दृष्टांत साहावा । नीच दृष्टांतु सातवां । दृष्टांत हे ची ॥४२॥
आतां दृष्टांताच्या वोळखी । तुज सांगो कौतुकीं । कवीरसु सर्व लोकीं । शोभे जेणें ॥४३॥
गगन गगनाकारें । सागर उपमे सागरें । तेवि ब्रह्मि ब्रह्म निर्धारें । एक्य दृष्टांतु हा ॥४४॥
स्वादें स्वाद दुसरा । भांगारे पाड भांगारा । नरें उपमिजे नरा । सम दृष्टांतु हा ॥४५॥
सूर्याची उपमा दीप । इंद्राचि उपमा नृप । असा जो ये रुपां । उंच दृष्टांतु तो ॥४६॥
जे मागां गुह्य शब्दिं उपमिले । ते गुह्य दृष्टांत संचले । चेरुनि वस्तुसी नेमिलें । या नांवाचें ॥४७॥
काळकूटा अमृत महिमा । प्रकाश ह्मणिजे तमा । असीया येति उपमा । त्या बाह्य रुपा ॥४८॥
मेरुची बरडा ह्मणावा । सूर्यो ह्मणीजे हातदीवा । दीनें भूपाळ उमावा । नीच दृष्टांत हा ॥४९॥
कोण्हाहि दृष्टांता न मिळे नेमें । जैसें भानुबिंबासी अश्मे । उपमा पडती चित्तभ्रमें । ते शून्य दृष्टांत ॥५०॥
जो दृष्टांते वलभा । त्याचा ग्रंथु पावे शोभा । येरि कविरेखा प्रभा । महा तमाची ॥५१॥
॥ इति दृष्टांत सप्त ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 07, 2018
TOP