मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
उत्तरखंडानुक्रमणी

आदिखंड - उत्तरखंडानुक्रमणी

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


यापुढां उत्तर खंड । तें अतिपाडें गोड । तेथें पुरवावें कोंड । माझे देवा ॥८५॥
नव देहें नवांकितें । ब्रह्म मशक पर्यत । हेंही निर्धारवंत । बाणें तें करा ॥८६॥
त्या देहाची उत्पत्तिभाव । कोण जाले कोणा पासाव । आणि ब्रह्मीहोनि हे सर्व । विस्तारले कैसें ॥८७॥
त्याचि स्थीति थारली कैसी । कोण प्रमाण त्यासि। आणिक अयुष्याची राशी। कोणा कैसी ॥८८॥
त्याचें कैसैं संहरण । कोणाचें कोण भजन । कोणेंयुगें पावन । कोणाचें होय ॥८९॥
ब्रह्मांडाएवढी ढिशाळें । कोठें थारलीं निश्चळें । वर्णाचार निर्मळे । नेमें सांगा ॥९०॥
बुध्दिनिश्चय थारे । तेहिं बोलावें निर्धारें । षटपंथ व्दादश व्दारें । निरुपावि मज ॥९१॥
या प्रपंचाचां निराशीं । आत्मदशा उरे कैसी । आणि ईश्वरप्राप्ति त्यासि । केवि लाभे ॥९२॥
आणि या मोक्षाकारणें । उठलिं अपरिमितें ज्ञानें । तो मोक्ष कवणें । उपायें फळें ॥९३॥
हा जी शूद्र ते कवण । कैसे होती ते ब्राह्मण । तेहिं कर्माचें पाळन । कैसें कीजे ॥९४॥
पुढां तत्वविवरण । तत्पद त्वंपद लक्षण । शबळ शुध्द कार्याकारण । सांगावें तें ॥९५॥
तत्वमसि वाक्य पदें । ते हीं सांगाविं एवंविधें । माया अविद्यासहित भेदें । निरसावया ॥९६॥
सांगावें त्रयलक्षण । भेदत्नय निरसन । ऐक्यबोधा प्रमाण । काय असे ॥९७॥
विवर्त्तु आणि परिणामु । याचा पाहिजे नेमु । याहि पुढां उत्तमु । असे किं नसे ॥९८॥
शरीरीं ब्रह्म तें कवण । स्वरुपाचें काय लक्षण । शद्रब्रह्मा प्रमाण । काय केलें ॥९९॥
साक्षाब्रह्मनिर्धार। कैसा होय साक्षात्कार । आणि सृष्टिपंथा विचार । निरुपावा ॥१००॥
हा जी वेदां आधारु तो कवण । वेदीं काय प्रमाण । आणि वेदाचें महिमान । कोठवरि ॥१॥
अहिंसा कोण काय हिंसा । गृहस्थधर्मु चाले कैसा । आणि वस्तुलाभु मानसा । कीति असे ॥२॥
किती अहंता ईश्वरी । ते विस्तारली कोणेंपरी । आणि दोनि मार्ग सांगा त्यावरी । उत्तम काय ॥३॥
सश्चिदानंदपदनेमु । आणि क्षरअक्षर उत्तमु । कर्मत्रयाचा अनुक्रमु । विस्तारावा ॥४॥
कर्म जगीं आदि ईष्ट । केवि निरसे दुर्घष्ट । कर्माही कर्म श्रेष्ट । अकमसीं सांगा ॥५॥
देहांति उपजे मति । कां जी होय तेचि गति । कोणें पदिं आत्मस्थिति । नेमली असे ॥६॥
उपनिषदांच्या श्रृती । तेहीं काय देखिले अंति । त्या कैस्या प्रतिपादिती । आत्मराजु ॥७॥
नेति काय निरसिलें । पूर्ण कवणातें देखिलें । जेथ मौन पडलें । ते कोण वस्तु ॥८॥
आध्यात्मिक आधिभूतिक । तिजें आधिदैविक । हें प्रतिपादुन सकळैक । येकविध बोला ॥९॥
पाठि च्यार भुमिका । निरुपाव्या सुरसिका । आत्मा दिसे तो निका । प्रकारु दावा ॥११०॥
तिन्ही अहंकारु ते तैसे । दृष्टि निवळती कैसे । दावा महत्व असें । हेतु सहित ॥११॥
पाठीं पूर्ण वस्तु दाखउनी । निरसा बो फळें दखोनी । जे पाहति मंदज्ञानी । प्रेत्नपूर्वक ॥१२॥
सर्वा सार नयन । बहुतिं मानिलें प्रमाण । याचें हिं करा निरुपण । सविस्तर ॥१३॥
जें सदोदित सर्वत्रीं दाटलें । जें समर्थ देखोनि निवालें । तें मज पाहिजे दाखवीलें । सर्वाचें सार ॥१४॥
सवेंचि वासनें रुप करा । तेहीं नाहींपणे सारा । यानंतरे स्वाचारा । लावा मज ॥१५॥
प्रतिष्ठा शुध्द वर्णाचार । वळा कुडा अनाचार । हा तरि येवढा संसार कोणें धर्में ॥१६॥
कर्म ब्रह्म समान । किं येकाहोनि येक न्यून । हें कळल्यां मन । सैराट नोहे ॥१७॥
यावीर माझा बोधु । तोही उघडैल प्रसिध्दु । पाठीं मीचि बोलेन शुध्दु । परमार्थु तो ॥१८॥
यावरी संप्रदाय तेवढा । निरुपा जी मजपुढा । प्रसन्न श्रीहरु चामुंडा । तेही सांगा ॥१९॥
एवं दीढशत अनुक्रमणी । रचावीं पंधरा कथनी । सिध्दि नेणें इतुकेनी । उत्तरखंड ॥१२०॥
॥इति उत्तरखंडानुक्रमणी ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP