आदिखंड - उत्पन्ननाम
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
यां पांचां पासुनु जें जें उठलें । तें तें परत्तत्वें व्यापीलें । ह्मणोनि नाव पावलें । प्रापंचिक हें ॥९२॥
असो हें तामसिं उत्पन्न । हे शुध्द श्रेष्ठ गहन । येहीं करावें साधन । बाह्य देहीचें ॥९३॥
सात्विक जनित अधिक । तें अंत:करण पंचक । भोक्ता साधन सुख । हें चि जाणें ॥९४॥
दशेंद्रीय पंचप्राण । यें भोग्यार्था साधन । महत्तत्व प्रमाण । सर्वत्रासी ॥९५॥
एवं पंचविस रुपा आली । ते जेथिचा तेथे मिनली । पुनरपी पांच चि जाली । मिळनी संगे ॥९६॥
दश इंद्रियें पंचप्राण । येक होति मिळोन । ते अंत करणादिकीं संचरुन । लीन होति ॥९७॥
तें अंत: करण समुदायेंसी । संचरुनि मिळे विषयासी । ते विषयें ही तैसी । मिळती भूतां ॥९८॥
त्या पंचभूतांचा गोळु । जाला एक चि महास्थुळु । पंचकृतमेळु । यासी बोलिजे ॥९९॥
असें जालयां एकत्र । तर्हिं वेगळें भावें सर्वत्र । जैसें अंगें चित्र । ऐक्य भेदें ॥१००॥
आतां स्वइच्छा सर्वोत्तमु । करिल याचा कर्द्दमु । तो परस्परानुप्रवेशधर्मु । आरंभला ॥१०१॥
ते कथन ज्ञानिया । अति दुल्लभ शिष्यराया । तो प्रसंगु सविया । श्रेष्ठ असे ॥१०२॥
हा पंचकृत घटु । जाला सर्वेश्वरु प्रगटु । आतां हिरण्यगर्भु आणि विराटु । पुढां सांगों ॥१०३॥
जे वेद शास्त्राचा प्रकाशु । वरि मनाचा हि पैसु । तो वक्ता श्री सिध्देशु । त्रिंबकाचेंनि मुखें ॥१०४॥
॥इति श्री चिदादित्ये प्रकाशे श्रीमव्दालावबोधे ब्रह्म सिध्देशोपदेशे पूर्णानंदे आदि खंडे पंचीकरण सर्वेश्वरतनु उत्पन्ननाम नवम कथनमिति ॥९॥श्रीगुरवेनम: ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 07, 2018
TOP