आदिखंड - सप्तवश्वनर उत्पन्न
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
॥ अनादित्वा न्न जातोऽयमजतत्वा न्न पश्णति ॥
॥ आत्मात्मव्यतिरिक्तं तु नाभिवां त्यसंभवात् ॥
अनादि ब्रह्म ईश्वरु । तो चि अजन्मु सांचारु । या कारणें संहारु । नसे तया ॥१॥
आणि तो कोठें हि उणा नसे । तैं स्वरुप जैसें तैसे । त्याचे लीळेये सर्वसें । होति जाति ॥२॥
कां जें ईश्वरी माया शबळ । तेथें चि आटे सूक्ष्मस्थूळ ।ते रक्षु न आदि मूळ । संहारु बोले ॥३॥
पूर्वी कलें निरुपण । त्या शबळ तत्पदाचें उत्पन्न । शबळ शुध्द कार्यकारण । आणिलें प्रत्या ॥४॥
तो शबळु ब्रह्मगोळु । जो दिसतसे विशाळु । आतां याचा आळुमाळु । वेंचु दाउं ॥५॥
च्यार सहस्र युगें मिळोनु । होय येकु ब्रह्मदिनु । येथ पर्यंत जनु । व्यापारें वर्ते ॥६॥
ऐंणेंचि प्रमाणें राति । तैं सर्वही व्यापार खुंटती । ये दीनांत प्रळयीं होती । समरस भूतें ॥७॥
जै पुरे ब्रह्मयाचा संकेतु । तो महाप्रळय विख्यातु । जेथ भूतें भूत ग्रासीतु । ब्रह्मगोळु आटे ॥८॥
तेथ शतवर्षे खडतरु । वमे शेषु तपे भास्करु । तेणें होये संहारु । चराचरांचा ॥९॥
पाठिं मुशलधारावृष्टी । विरे जळाली सृष्टी । महत् ज्वाळ व्यष्टी ।त्या प्रळयजळासी ॥१०॥
तो वणवा जळावरी । करी जळाची बोहरी । मग तो सर्व ही जठरीं । वायो ग्रासी ॥११॥
तो वारा व्योमी वीरे । तें व्योम अहंकारीं भरें । वेदीं वेदांतीं उत्तरें । असीं आहाति ॥१२॥
या ही समर्थ येक वाणि । कैलासा ये श्रूळपाणि । ते प्रळयाची मांडणी । विचित्र असे ॥१३॥
तरी मुख्य ब्रह्मा तो कवणु । कैसी युगें कोण दिनु । हे सर्व ही आइकुनु । सुखी होसी ॥१४॥
तरि जो ब्रह्मीहोनी उठला । मायासंगे रुपा आला । सगुन ब्रह्म हा संचला । आदि ब्रह्मा ॥१५॥
मागां केलें निरुपण । ज्याचें अंग त्रिभुवन । तो सर्वेश्वरु जाण । मूळ ब्रह्मा ॥१६॥
च्यारि युगें कृतापासुनू । हें महद्युगाचें प्रमाण । यामाजी अवतार पूर्ण । विष्णुचे दाहा ॥१७॥
बत्तिस सहस्र च्यारि लक्ष । हे चि अवतारसंख्या मुख्य । युगप्रमाणें प्रत्यक्ष । गणना पाहावीं ॥१८॥
येकु कळी दोनि व्दापरीं । त्रेंति तिन कृतीं च्यारीं । प्रमाण बोलिलों येथ दुसरी । विचारणा नसे ॥१९॥
सहस्त्रांविसां तिरेताळी सां लक्षा । हे चौकडीची संख्या । येणें चि प्रमाणें शिष्या । महद्युग बोलिजे ॥२०॥
असीं सहस्र युगें पर्यंत । जीवसृष्टी होत जात । तंव वरि हे सचेत । चराचर सर्व ॥२१॥
तंवरी चि ब्रह्मा सृष्टीकरिता । तंवरी चि विष्णु पाळिता । तंवरी चि संहारकर्ता । महारुद्रु ॥२२॥
तंवरी च भूतव्यापारु । तंवरी शेष वरुण पुरंदरु । यम अग्री भास्करू । तंवरि चि हे ॥२३॥
या दिवसां माझारीं । दाहा सहस्र वेळां हरी । खेळे नाना अवतारी । श्वास संख्यें ॥२४॥
पाठि यांचे शयन । सहस्रां चौकडीयाचें प्रमाण । तैं व्यापार होति लीन । सर्वत्राचे ॥२५॥
गीता वेद भाष्य वेदांतें । असी ब्रह्मायुचीं गणितें । सिध्दांत शिरोमणिचे मतें । असें असे ॥२६॥
येका हा तरी चौकडीया मिळोनु । त्यासी ह्मणिजे येक मनु । चौदा मनुचा ब्रह्मदिनु । येकु होय ॥२७॥
असेंचि त्याचें रात्रिमान । एवं अठाविसां मनुचें प्रमाण । हें अहोरात्र पूर्ण । ब्रह्मयाचे ॥२८॥
तैं येक सहस्र नवशतें अठीयासी । होय चौकडीयाचि राशी । तैं सातसहस्र नवसें बावन असी । युगें होती ॥२९॥
असें छत्तिस सहस्र दीन । हें ब्रह्म शतायुचें प्रमाण । हे गणित पुरातन । पूर्वज्ञ बोलिले ॥३०॥
हें देवाचें आयुष्य ।तैं महामनु प्रत्यक्ष । असी सहस्र दाहा लक्ष । होति निमति ॥३१॥
तैं चौकडीया सात कोडी । पंधरा लक्ष सहस्र अडसटी । ब्रह्मशतांचां पोटीं । इतुकें नाशे ॥३२॥
तै तिनकोटि साटि लक्ष परिकर । होति विष्णुचे अवतार ।येर सुरादिक चराचर । कोण लेखी ॥३३॥
या ब्रह्मशतांतु कारण । वर्षें क्रमलिं त्रिपण । दिसां मासाचें प्रमाण । जालें नाहि ॥३४॥
जालिया तेरा घटीका । चाले चौदाविं अधिका । चाळिस पळें भरलीं आणिका । पळाचि प्रवृत्ति ॥३५॥
गेलि येकुन पनास अक्षरें । आतां पंनासावें विचरे । असी सिध्दांति उत्तरें । शिरोमणिचिं ॥३६॥
या ब्रह्म दिवसांतु कारणु । चालतसे वैवस्वत मनु । याच्या चौसटी चौकडीया क्रमुनु । हे वरिचिल जातिसे ॥३७॥
ते चौकडीचे अंग । चाले चौथे कलियुग । याचें प्रवृत्ति पासुनि चांग । हें प्रमाण जालें ॥३८॥
वर्षाचे गणित ।
अक्षर ३९६६०
श्वासु ३९७६००
ब्रह्मपळ ३३८५७००
ब्रह्म घटीका १४३१३६०००
ब्रह्म दिवस ८५८८१६००००
ब्रह्ममास २५७६४४८०००००
ब्रह्म वर्ष ३०९१७३७६०००००
ब्रह्मशतायु ३०९१७३७३०००००००
उरलें आयुष्य व्दिजवरा । सेताळिस वर्षें मास अकरा । येकुनतिस दीस सां प्रहरा । वरि घटिका येकि ॥३९॥
येकुनविस पळें निर्धारें । त्यावरी दाहा अक्षरें । हें भोगावें दातारें । सृष्टिक्रमिं ॥४०॥
गणित असें असे याचें ।येक अक्षर ब्रह्मयाचें । येकुनचाळीस सहस्र सातसें साटी आमचे । संवत्सर होति ॥४१॥
तीनलक्ष सत्यानऊ सहस्र सा शतें । यें ब्रह्मश्वासाचीं गणितें ।
तेतिस लक्ष पंच्यासी सहस्र सातसें निरुतें । ये संवत्सर ब्रह्म पळाचे ॥४२॥
कोटि चौदा लक्ष येकतीस ।सहस्र छतिस सर्वस । ब्रह्मघटिकेचे परीयेस । संवत्सर नराचे ॥४३॥
आठसें अठावन कोटी । येक्यासि लक्ष सहस्र साटी । ब्रह्म दिवसांचें पोटीं । सवत्सर भूताचे ॥४४॥
पूर्ण अर्बुदें पंचविस । कोटि सातसें चौसटी सर्वस । वरि लक्ष अठेताळिस । ते मासिं प्रमाण हें ॥४५॥
तीन खर्वे नव अर्बुदे वरी । कोटि येकशत तिरातरी । स्याहातरी लक्ष ते संवत्सरी । वरुषें ॥४६॥
पुदातिं पद्में सुविदें । नव खर्वें सतरा अर्बुदें । तिनस्यें स्याहातरी कोटीयेइ अब्दें । ब्रह्मशताचीं ॥४७॥
ब्रह्म आयुष्य तेतुलें । हें प्रमाण सांगीतलें । मागां दिवस भोगीले । तें हि बोलिलों ॥४८॥
उरलें आयुष्य त्याचें । ते हि बोलिलों वाचें । हे भोगुनि त्या देवाचें । खचैल देह ॥४९॥
आतां त्या देवा ना नाशु । ह हि बोलों उदासु । भूतें भूतांचा ग्रासु । आरंभे जो ॥५०॥
तै पुरे सृष्टीचि अवधि । अवर्षण पडे आधी । हातु आखुडी विधी । नारायणु ॥५१॥
पडे आयुष्यासी चीरा । मरण ये अमराच्या घरा । रोगा विघ्राचा खरा । डाव वळे ॥५२॥
तै रुद्र प्रगटे उदासु । करी सर्वत्रांचा ग्रासु । हा अनुक्रमु सर्वसु । बोलों आतां ॥५३॥
या महा भूतांचा आटणिं । प्रगटती सात वन्हि ।येदथीं सुजाणी । चित्त देणें ॥५४॥
तैं मुख पसरी कृदांतु । करी सर्वाचा घातु । तेथुनु प्रगटे हुतु । काळानळु तो ॥५५॥
हा काळाग्रि ज्वरु रुपें । पाडी समस्तें जीवलेपें । चित्ताग्रीचें स्वरुपें । हा चि वर्ते ॥५६॥
दुजा आग्रेयदिशापति हुतु । तो सृष्टीक्रमी वर्त्ततु । तो क्रव्यादानळ मांडी घातु । वणवितु चाले ॥५७॥
तो सप्तजिव्हा लाळी । ग्रामे गीरी वनें जाळी । करी सर्वाची होळी । एकें भडकां ॥५८॥
पाठिं सागरीफ़्चा वडवाग्री । शोखीं समुद्रीचें पाणी । सर्व जळांची आटणी । तो चि करी ॥५९॥
संचरुनि महीचां पोटीं । निर्वोल करी सृष्टी । सवें चि भुगोळ कंवटी । वडवानळु तो ॥६०॥
तथा चि सहस्र कर घांसोनि । नाशा प्रवर्ते तरणि । बारा रुपें येक होऊनि ।उग्र तपे ॥६१॥
त्यासी उर्मिकळा उठे । उर्मि पासुनि धूम्र प्रगटे । धूम्रे ज्योति तेथुनि दाटे । महद ज्वाळ ॥६२॥
या निर्वाणज्वाळें । ग्रह तारा सर्व जळे । ब्रह्मांड ही सूर्यानळें । वणवुं लागे ॥६३॥
तैसेंचि आपुलें उन्मेषें । सहस्रा ही मुषीं शेषे । वमावी माहाविषें । संहार समयीं ॥६४॥
तेथ तेणें विषानळें । जळती नागकुळें पाताळें । एवं विशेष अग्रि हळाहळें । बोहरी कीजे ॥६५॥
आणिक जो महिचां पोटीं । असुनि महीते आवटी । मृत्तिकेची करी खोटी । भुवानळु जो ॥६६॥
जो धातु शीळा वृक्षजातु । निरंतर गुप्त शांतु । तो भुवाग्रि पुरवीं संकेतु । या भूमंडळाचा ॥६७॥
सवें ची महारुद्राचा लोचनु । कैलाशीं उघडे दारुणु । तेथुनि प्रगटे हुताशनु । हराग्रितो ॥६८॥
तो स्वर्गाच्या उतरडी । जालोनि करी राखोंडी ख। पाडीं सुरगणांची धेंडी । रुद्रानळु तो ॥६९॥
असे व्यापार । करीति सात ही जठर तेणें हें सर्व चराचर । जळोनि भस्म होय ॥७०॥
या सप्ताग्रीचा मेळु । हेळा जाळिती ब्रह्मगोळु । पाठीं आपुल्या मूळा काळ । हे चि होती ॥७१॥
जैसा वेळुवाचा हुताशु । करी वनाचा ग्रासु । त्या वेळुवांचा ही नाशु । तेणें चि होये ॥७२॥
॥ इति सप्तवश्वनर उत्पन्न ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 07, 2018
TOP