मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
आवरण भाव

आदिखंड - आवरण भाव

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


असो जेथ तत्वाची बीजें । त्यासी महत्तत्व म्हणिजें । यासी आदि ते जाणिजे । महदादि माया ॥५०॥
माये ही आदि ईश्वरु । तो देवो कूटस्थ अक्षरु । सर्व बीजाचा सागरु । वोळखावा ॥५१॥
माया सर्वा गोसाविणि ।ते ज्या देवाची घरणी । तो ईश्वरु बुध्जनीं । न ह्मणिजे कैसा ॥५२॥
समस्ते मायेते चाळकु । माया अंतर्व्यापकु । तो कूटस्थ हा विवेकु । नव्हे कैसा ॥५३॥
सर्व ही रुपें नटला । परि नाहिं भेदे फुटला । तरि तो अक्षरु या बोला । चूकि नाहि ॥५४॥
माया आदि अलक्ष । अनंत मर्याद असंख्य । तीचें आवरण प्रत्यक्ष । तें चि असे ॥५५॥
महतत्व माये पासुन । तें तिचांचि पोटि आसून । तये परिस न्यून । दश गुणातें ॥५६॥
तया पासावें अहंकारु । तो त्याचा चि गर्भि साचारु । दशगुणा आवरु । उणा त्याचा ॥५७॥
त्याचें उदर्य गगन । ते हीं तद्रर्भ आझून । दशांशें आवरण । उणें त्याचें ॥५८॥
जन्मला नभापासुनु । तो नभाचि मध्यें पवनु । नभा परिस द्शगुणु । उणावो त्याचा ॥५९॥
पवनापासुनि हुतु । तो हि त्यांतुचि साक्षातु । दशगुण संकेतु । उणा त्याचा ॥६०॥
तेजा पासाव जळ । ते ही तद्रर्भ सकळ । हें त्याहोनि उणें केवळ । दशम भागें ॥६१॥
जन्मली जळा पासुनी । ते हि त्याची मध्यें मेदिनी । ते दाहावें भागें उणी । जळा परीस ॥६२॥
इति आवरण भाव ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP