मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
कर्मयोगो नाम

आदिखंड - कर्मयोगो नाम

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


पुससी तरी भर्वसेनि । जीव कर्मा चि पासुनि । हे हीं आतां मुळीं होनि । कथा सांगो ॥५॥
ब्रह्मिहोनि कर्म उठे । तें कर्मवेदिचें मोजिठें । कर्मे हुतु प्रगटे । हुते अभ्र ॥६॥
जळ अभ्रापासुन । जळे औषधी उत्पन्न । औषधीचे अन्न। बीज रुप ॥७॥
अन्नाने वीय । निफजे । त्या पासाव देह उपजे । ये सृष्टिचि बीजें । ठाई हुनि ॥८॥
येथूनि कर्म प्रमाणें । यां जीवासी जन्म मरणें । बृहदार्णिकी बोलणें । असे असे ॥९॥
कृत कर्मानुसारें । फळें भोगावीं निरंतरे । एवं कर्माचें पडिभरे । जीवसृष्टी ॥१०॥
ह्मणौनि भूतांदिकां सकळां । तुं भज गा भजनशीलां । परी येथें चि कोण्हे वेळां । गुंतो नको ॥११॥
न भजतां समीप न येति । आणि भजतां बाधके नव्हती । या पूर्णज्ञानाचि स्थिति । असी असे ॥१२॥
असा त्रीबकुं संविदु । करी ग्रंथानुवौ । कां जे लाधला प्रसादु । श्रीसिध्देश्वराचा ॥१३॥
इति श्रीचिदादित्ये प्रकाशे श्रीमव्दालावबोधें ब्रह्म सिध्देशोपदेशे पूर्णानंदे आदिखंडे खेचर उत्पन्न तथाच कर्मयोगो नाम एकादशक कथन मिति ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP