आदिखंड - परस्परानुप्रवेशु
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
जो थूळ भागु उरला । त्याचा कर्दमु केला । तो स्वईच्छा कालविला । माया पुरुषें ॥१७॥
त्या उभयांचेंनिमुखें । महातेजे कर्द्दमु शोषे । त्याचे भाग सारिखे । जाले पांच ॥१८॥
पाचांचे पंचविस गुण । ते ही परस्परे फुटोन । पंचभूतां मिळोन । विस्तारले ॥१९॥
हा परस्परानुप्रवेशुं केवळु । विस्तारला ब्रह्मगोळु । जो बोलिजे सकळु । विराट पुरुषु ॥२०॥
एक भूत पंचधा केलें । तें पांचा पांचा ठाईं वाटिलें । यासी पंचकृत बोलिलें । विव्दज्जनी ॥२१॥
एकु रक्षिती शरीरी । चौघांचे घेती च्यारी । हा अनुक्रमु कुसरी । आणू रसा ॥२२॥
नभिं प्रसिध्द अंत:करण । वायुचें घेतलें मन । बुध्दि तेजा पासुन । मिळे नभा ॥२३॥
चित्त दिधलें जळें । अहंकारु महिचा मिळे । एवं अंत:करणा दिक मेळे । व्योम वत्तें ॥२४॥
मेळु करी पवनु । व्योमाचा आला व्यानु । थीर राहिला समानु । आंगीचा आंगीं ॥२५॥
उदानु तेजाचा आपाचा अपानु । महीचां मिळे घ्राणु । एवं पंचप्राणी पवनु । वर्त्तता जाला ॥२६॥
तवं तेजें काय केलें । श्रोत्र नभाचे घेतले । वायोची त्वचा रक्षिले । स्वयं चक्षु ॥२७॥
रसना अंबुपासून । घेतले महीचे घ्राण । एवं ज्ञानपंचकाचें आधिष्ठान । तेजतत्वीं ॥२८॥
मांडला मेळुं जळाचा । नभाची वोढिली वाचा । वायोचें कर तेजाचा । भागु पाद ॥२९॥
स्वयं शिश्न प्रसिध्द । भूमीचे घेतले गुद । हें कर्म पंचक शुध्द । आपा आलें ॥३०॥
मांडला मेळु मेदिनी । शब्दु ये नभापासुनि । स्पर्श वायोरुप वन्हि । दत्ता होये ॥३१॥
उदकाचा रसु आला । गंधु निजगुणें आथिला । हा महीचा मेळु जाला । विषया पंचकी ॥३२॥
॥इति परस्परानुप्रवेशु ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 07, 2018
TOP