मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
पंच देवता

आदिखंड - पंच देवता

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


आह्मीं बोलो नावां असें । जे जें प्रत्यक्षाकार दीसे । ते घेणे विश्वासे । सादरें सीं ॥७६॥
जया पासुनि देवी देव । गुण आकार नाम सर्व । तें सांगैन आईक भाव । भर्वसेनी ॥७७॥
तुं पढीये जीवासी । केवी मन गुह्य ग्रासी । ते या ग्रंथाचा मिसी । उचंबळत निगे ॥७८॥
जैसी मधाची कुत्रि । ग्रासिलें वोने पुडती । कां जें बाळांचें आर्त्ति तीचें ॥७९॥
आपले या सर्व हुटहुटें । तरीं सांग पां गुह्यें केवि सांटे । कंठ फुटोनि उमटे । दाटलेंपणें ॥८०॥
श्रीगुरुनें येक करावें । गुह्य अनिष्टां नेंदावें । आपलें आपुणें सांटवावें । उदधी असें ॥८१॥
एकें गुरु कुळें ऐसीं मूर्खें । साभिलाषाचेंनि सुखें । पढियेल्याहि राखे । निगतां गुह्य ॥८२॥
ते असो श्वानबुध्दि । सुभूमीं पेरावें आधीं । तु प्रेमाची निधी । राखों नये ॥८३३॥
जेणें हे सर्व दाटलें । ते महद्रूप संचलें । हे तों मांगां सांगीतलें । पुढां हीं सांगो ॥८४॥
सांगीतलें नये रुपा । प्रत्यक्ष देउं रे बापा । ये तत्वेंचीं पाहें पां । स्वरुप देवतें ॥८५॥
आकाश व्यापक संपूर्ण । सदा सर्व समान । सदाशिव गे गगन । भर्वसेनि ॥८६॥
पवनु प्रत्यक्ष सर्वगतु । ईश्वरादिकांते चाळितु । वायोचें सूत्र असंक्षातु । ईश्वरु तो हा ॥८७॥
तेज सर्वा प्रकाशु । सर्व फळें तो हुताशु । करी सर्वांचा ग्रासु । हा चि रुद्रु ॥८८॥
आप समेगत सर्व मेळो । हरिहर ब्रह्मादिकांते पाळीं । सन्मिळ प्रतिष्ठा जळीं । जळचि विष्णु ॥८९॥
जेथुनि सर्वाचे उत्पन्न । ते धरा धरत्री आपण । क्षिति ब्रह्मा हें वचन । प्रसिध्द असे ॥९०॥
यांची सूक्ष्में शरीरें । ते देखावीं ज्ञातारें । येरवी शूळ बुध्दीबारें । नपडती ठाईं ॥९१॥
॥इति पंच देवता ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP