मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
दृष्टांतनिर्धार

आदिखंड - दृष्टांतनिर्धार

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


कोण्हें ही वस्तुसी पाहीं । प्रमाणेविण रुप नाहीं । प्रमाणें नेणे तो हि वक्ता नोहे ॥५२॥
प्रत्यक्ष देखती नयन । या नाव प्रत्यक्ष प्रमाण । बोलिलें घेति श्रवण । शाब्दिक तें ॥५३॥
घडे उपमे पासुन । याचें नाव उपमान । घेईजे कार्याचें कारण । अनुमान तें ॥५४॥
वेदशास्त्र वेदशास्त्र पुराण । असें मूळ धरुन । बोलिजे तें प्रमाण । शाब्दिक होये ॥५५॥
जे उत्तम दृष्टांत बोलिलें । तेहीं कवित्व चालिलें । असें उपमेंसी जें आलें । तें चि उपमान ॥५६॥
आतां जे काहिं आइकीजे गोष्टी । तिसी अनुमानु बैसविजे पाठोवाटीं ।
कार्य काढिजे कारणांचां पोटीं । त्यासी अनुमानु बोलिजे ॥५७॥
देखिलें वस्तुसी निर्धारु । जो जो होय साक्षात्कारु । हें प्रत्यक्ष प्रमाण चातुरु । जाणें तो भला ॥५८॥
विचारुनि घटाघट कवि । नेमस्तें प्रमाणें बोलाविं । मग सहजची वोवी । वोविली एईल ॥५९॥
जैसी संतानाची वोलि । किं महामणिची प्रभावळि । किं कर्पुराचा रवाळी । अंतर्बाह्य ॥६०॥
अथवा यंत्रव्दारें सूवर्णासूत । वळण गुढरहित । असें जें येईल कवित । तें चि निर्मळ ॥६१॥
उंच नीच नेणती । पारिक्याचें हेवें बोलती । देखोवेखि जल्पति । तें कवित्व नोहें ॥६२॥
जे अमाणीक वोवी । ते तृणाविशेषें हळुवी । आणि येकें चि प्रमाणें कवि । शोभा नेदि ॥६३॥
श्रृत दृष्ट अनुमान । बोलिजे प्रमाणें तीन । याहि वरी उपमान । अनर्ध्ये शोभे ॥६४॥
यांचे हि कारण असे । जें बहुतें प्रकारें बैसें । विचारुनि बोलिजे ते तैसें । शुध्द होय ॥६५॥
येरवी पाठु आणि प्रसादु । ऐणें शोभे प्रबंधु । धिठाया बोलतां शुध्दु । ग्रंथ नव्हे ॥६६॥
ह्मणौन जगजनकें सिध्देश्वरें । तेणें जगद्रुरु दातारें । आमते केले सोपारें । त्र्यंबकु ह्मणें ॥६७॥
॥ इति श्री चिदादित्ये प्रकाशे श्रीमब्दालावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे आदिखंडे दृष्टांतनिर्धार नाम त्रयोदश कथन मिति ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP