मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
कर्म धर्म गुण

आदिखंड - कर्म धर्म गुण

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


आकाशा कर्म पोकळी । वायोसी चळन सर्वकाळीं । तेजा उष्णता जळीं । द्रवण कर्म ॥६३॥
महिचे कर्म कठिण । आतां धर्म निरुपण । स्वभाव नैसर्गिकु लक्षण । ते चि धर्म ॥६४॥
आकाशें आपुलें सामर्थ्यपणें । सर्वा अवकाशु देणें । चळे चाळावें पवनें । चळनधर्मु त्याचा ॥६५॥
सर्व देहावें तेजें । यासी दहन धर्मु साजे । उदकें कंदन कीजे । तो धर्मु तया ॥६६॥
जे जे भूमीवरी पडे । ते त्या धरावें तेव्ह्ढें । भारु नेणें एणे पाडें । हा धर्मु तीचा ॥६७॥
गुणाचा निवाडु असा । सांगो शुध्दबुधु तैसा । जेणें प्रबुध्दाच्या मानसा । संतोषु होय ॥६८॥
नभिं शब्द गुणु साक्षातु । जो ज्ञानी आइकाती निश्चळितु । एरा गुणांची मातु । काय तेथें ॥६९॥
प्रत्यक्ष गर्जे पवनु । आगिं आदळे तो स्पर्शु गुणु । या दों गुणावाचुनु । येर तेथें नाहीं ॥७०॥
शब्दें गर्जावें अनिळें । स्पर्श तरीं आगीं आदळें । रुप ते देखती डोळे । हे तीनिच गुण तेजा ॥७१॥
उदकी खळाळ शब्दु उठे । स्पर्श तरी प्रत्यक्ष आपटे । रुप तें होय दीठे । तैसाचि रसु ॥७२॥
पाहातां अनुक्रमें क्षीति । सर्वही गुण दीसती । तें का मीं आणूं वित्पत्ति उदास दीसे ॥७३॥
नीच गुणु उचां भरे । तो आणिकाचेंनि आकारें । परि मिं बोलिलों निर्धारें । हें चि घडे ॥७४॥
येकु चि गुणु गगना । वायोसि दोनि तिनि हुताशना । उदका च्यारिं पंचगुणां धरत्री होय ॥७५॥
इति कर्म धर्म गुण ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP