मजवर कृपा करावी - प्रभुवर मजवर कृपा करावी म...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
प्रभुवर मजवर कृपा करावी
मतिमलिनता हरावी माझी ॥ मजवर.... ॥
भरो प्रेम अंतरंगी
जडो जीव संतसंगी
मम अहंता गळावी सारी ॥ मजवर.... ॥
नुरो तम अता समीप
जळो हृदयी ज्ञानदीप
मति तव पदी जडावी माझी ॥ मजवर.... ॥
-धुळे तुरुंग, मे १९३४
N/A
References : N/A
Last Updated : April 09, 2018
TOP