मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
काय सांगू देवा, कोणा सांग...

काय सांगू देवा, कोणा सांगू? - काय सांगू देवा, कोणा सांग...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


काय सांगू देवा, कोणा सांगू?॥

माझ्या चित्ता आता नाही मुळी धीर
रात्रंदिन वाहे डोळ्यांतून नीर
तुजला वाटे काय माझी चीरचीर॥ काय....॥

धूळीमध्ये गेले तनमन मळून
तूझ्या अमृतहाते टाकी रे धुवून
तूझ्या पायाजवळी ठेवी मग निजवून॥ काय....॥

कुविकारांची थंडी टाकी गारठवून
नाही नाही काही मजला संरक्षण
तूझा शेला देवा घाली पांघरूण॥ काय....॥

मेघावीण कैसा नाचेल रे मोर
चंद्रावीण कैसा हासेल चकोर
आईवीण सांग कोठे जाइल पोर॥ काय....॥

तूझा एक देवा! अनाथा आधार
भक्तांचा तू सतत चालवितोसि भार
म्हणुनी आलो तूझे शोधित शोधित दार॥ काय....॥

माते! मंगलमूर्ते! उघडी आता दार
माझ्या शोका नाही, आई! अंत पार
तूझ्या बाळा आता तार किंवा मार॥ काय....॥

-धुळे तुरुंग, मे १९३२

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP