भाग्याचे अश्रु - अनुताप- आसवांनी। कासार मा...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
अनुताप- आसवांनी। कासार मानसाचे
भरते तुडुंब तेव्हा। ती भक्तिवेल नाचे
त्या भक्तिवेलावरती। चित्पद्म ते फुलेल
येऊनिया मुकुंद। मग त्यात तो बसेल
रड तू सदैव बाळा। भरु दे तुडुंब हृदय
येईल भक्ति मग ती। होईल सच्चिदुदय
ते भाग्यवंत अश्रु। जवळी तुझ्या विपूल
हसशील लौकरीच। जरि आज तू मलूल
-धुळे तुरुंग, मार्च १९३२
N/A
References : N/A
Last Updated : April 20, 2018
TOP