मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
दु:ख मला जे मला ठावे मदश्...

दु:ख मला जे मला ठावे - दु:ख मला जे मला ठावे मदश्...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


दु:ख मला जे मला ठावे
मदश्रुचा ना
अर्थ कळे त्या
आत जळून मी सदा जावे ॥ दु:ख.... ॥

‘असे भुकेला
हा कीर्तीला’
ऐकून, भरुनी मला यावे ॥ दु:ख.... ॥

‘एकांती बसे
अभिमान असे’
वदति असे ते मला चावे ॥ दु:ख.... ॥

‘या घरच्यांची
चिंता साची’
ऐकून, खेद न मनी मावे ॥ दु:ख.... ॥

नाना तर्क
काढित लोक
नयनी सदा या झरा धावे ॥ दु:ख.... ॥

तू एक मला
आधार मुला
बसून तुझ्याशी विलापावे ॥ दु:ख.... ॥

-नाशिक तुरुंग, ऑक्टोबर १९३२

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP