माझी बुडत आज होडी - माझी बुडत आज होडी मज कर ध...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
माझी बुडत आज होडी
मज कर धरून काढी ॥ माझी.... ॥
तुफान झाला सागर सारा
मज सभोती वेढी ॥ माझी.... ॥
लोटितील मज भीषण लाटा
खचित मृत्यु-तोंडी ॥ माझी.... ॥
शांत करी रे तुफान दर्या
काळमुखी न वाढी ॥ माझी.... ॥
अपराध तुझे रचिले कोटी
परि धरी न आढी ॥ माझी.... ॥
पुनरपि माते राहीन जपूनी
करीन कधी न खोडी ॥ माझी.... ॥
रागावली जरी माय मुलावरी
संकटी न सोडी ॥ माझी.... ॥
ये करुणाकर ये मुरलीधर
हात धरुनी ओढी ॥ माझी.... ॥
किती झाले तरी मूल तुझे मी
प्रेम कधी न तोडी ॥ माझी.... ॥
इतर कुणी ते धावान येतील
आस अशी न थोडी ॥ माझी.... ॥
बाळ तुझा हा होऊन हतमद
हाक तुजसि फोडी ॥ माझी.... ॥
आजपासुनी तव करि राया
सोपवीन होडी ॥ माझी.... ॥
मुरली वाजव सागर शांतव
वादळास मोडी ॥ माझी.... ॥
मुरली वाजव, वादळ लाजव
दाव गीतगोडी ॥ माझी.... ॥
जीवन तव पदी वाहून बालक
हात तात! जोडी ॥ माझी.... ॥
-पुणे, ऑक्टोबर १९३४
N/A
References : N/A
Last Updated : April 09, 2018
TOP