सदा राम गुंफिन
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
जीवनात माझ्या सदा राम गुंफिन
सकळ इंद्रियांनी माझ्या राम चुंफिन॥ जीव....॥
सत्यं शिवं सुंदराचे
पूजन मी कारिन साचे
ह्यास्तव मी या जीवाचे
मोल अर्पिन
राम गुंफिन॥ जीव....॥
विमलभाव सरलभाव
मधुरभाव प्रेमभाव
सेवा नि:स्वार्थभाव
त्यात ओतिन
राम गुंफिन॥ जीव....॥
ज्ञान, भक्ति, कर्म तीन
पदर असे दृढ धरुन
श्रद्धेने पीळ भरुन
मोक्ष मिळविन
राम गुंफिन॥ जीव....॥
-धुळे तुरुंग, मे १९३२
N/A
References : N/A
Last Updated : April 20, 2018
TOP