प्रिय भारता सुंदरा! - प्रिय भारता सुंदरा!।। ज्ञ...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
प्रिय भारता सुंदरा!॥
ज्ञानविहारा! परम उदारा!
कुदशा जाइल तव कधि दूरा?॥ भारता....॥
सत्त्व कुठे तव? त्याग कुठे तव?
तोडी कवण तव सुयशो-हारा?॥ भारता....॥
पुत्र न दिसती, वैरी गमती
जे तुज लोटिति दुर्गति-दारा॥ भारता....॥
शोक न करि तू प्रभुला प्रिय तू
अवतरुन तुला तारिल, मधुरा!॥ भारता....॥
-अमळनेर, ऑगस्ट १९३१
N/A
References : N/A
Last Updated : April 23, 2018
TOP