मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
हृदय जणु तुम्हां ते नसे।।...

हृदय जणु तुम्हां ते नसे! - हृदय जणु तुम्हां ते नसे।।...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


हृदय जणु तुम्हां ते नसे॥
बंधु उपाशी लाखो तरिहि
सुचित विलास कसे॥ हृदय....॥

परदेशी किति वस्तू घेता
बंधुस घास नसे॥ हृदय....॥

बाबू गेनू जरि ते मरती
तरिही सुस्त कसे॥ हृदय....॥

खादी साधी तीहि न घेता
असुन सुशिक्षितसे॥ हृदय....॥

माणुसकी कशि तीळ ना उरली
बसता स्वस्थ कसे॥ हृदय....॥

जगतामध्ये निज आईचे
हरहर होइ हसे॥ हृदय....॥

कोट्यावधी तुम्हि पुत्र असोनी
माता रडत बसे॥ हृदय....॥

देशभक्त ते हाका मारिति
त्यांचे बसत घसे॥ हृदय....॥

स्वदेशिचे ते साधे अजुनी
तत्त्व न चित्ति ठसे॥ हृदय....॥

बंधू खरा जो बंधुसाठी
प्राणहि फेकितसे॥ हृदय....॥

पुत्र खरा जो मातेसाठी
सर्वहि होमितसे॥ हृदय....॥

बंधू रडता आई मरता
कुणि का स्वस्थ बसे॥ हृदय....॥

-अमळनेर, सप्टेंबर १९३१

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP