मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
बाल्यापासुन हृदयात बसुन ग...

मनोमंदिर राम - बाल्यापासुन हृदयात बसुन ग...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


बाल्यापासुन
हृदयात बसुन
गोष्टी सांगे गोड
पुरवि माझे कोड
सोडुन गेला परि तो आज माझे धाम
कोठे गेला सांगा रुसुन माझा श्याम
कोठे गेला माझा मनो-मंदिर राम
हाय मी काय करू ॥

सुख ओसरे
हास्य दूर सरे
खेळ संपले
बोल थांबले
माझ्या घरामधले दिवे मालवून
माझी होती नव्हती दौलत चोरून
गेला कैसा केव्हा हच्चोर पळून
हाय मी काय करू ॥

आता उंदिर घुशी
येथे दिवानिशी
करितिल खडबड
करितिल गडबड
पोखरून टाकतिल माझे हृदय-राउळ
कामक्रोधा आयते मिळेल वारुळ
आत चिंतेचे शिरेल वटवाघुळ
हाय मी काय करू ॥

-त्रिचनापल्ली तुरुंग, नोव्हेंबर १९३०

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP