सदयहृदय तू प्रभु मम माता - सदयहृदय तू प्रभु मम माता ...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
सदयहृदय तू प्रभु मम माता
घेई कडेवर हासव आता ॥सदय.... ॥
अगतिक बालक
कुणी ना पालक
त्रिभुवनचालक तू दे हाता ॥सदय.... ॥
काही कराया
येई न राया
लाजविती मज मारिती लाथा ॥सदय.... ॥
धावत येऊन
जा घरी घेऊन
वाचव मज तू नाथ अनाथा ॥सदय.... ॥
-धुळे तुरुंग, मे १९३२
N/A
References : N/A
Last Updated : April 10, 2018
TOP