कधि येशिल हृदयि रघुराया - कधि येशिल हृदयि रघुराया क...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
कधि येशिल हृदयि रघुराया
कधि करुणेची करिशिल छाया॥ हृदयि....॥
मोह न मजला मळि आवरती
अगतिक मी अति
पडतो पाया॥ हृदयि....॥
बहुमोलाचे हे मम जीवन
हे करुणाधन
जाई वाया॥ हृदयि....॥
होइल सदया जरि व दया तव
ठेवु कशास्तव
तरि मम काया॥ हृदयि....॥
-नाशिक तुरुंग, सप्टेंबर १९३२
N/A
References : N/A
Last Updated : April 20, 2018
TOP