मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
तुजवीण अधार मज कोणि नाही

तुजवीण अधार मज कोणि नाही

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


तुजवीण अधार मज कोणि नाही॥
पथ कोण दावील
कर कोण घेईल
नेईल सांभाळुनी कोण, आई!॥ तुजवीण....॥

बघतो तुझी वाट
नयनांतानी पाट
गळा दाटतो सांगु तुजलागि कायी॥ तुजवीण....॥

हसतात सारे
न दया कुणा रे
दिशा शून्य राया! तुझ्यावीण दाही॥ तुजवीण....॥

पथि मी उभा रे
हसतात सारे
मला होटिती, मी रडे धायिधायी॥ तुजवीण....॥

जग मत्त हे जात
नत मी उभा तात!
ये हात धरुनी मला नीट नेई॥ तुजवीण....॥

कधिही तुझ्यावीण
पद मी न टाकीन
जावो जरी जन्म हा सर्व जाई॥ तुजवीण....॥

-पुणे, सप्टेंबर १९३४

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP