मदीय त्या नमस्कृती - विशुद्ध भाव अंतरी कृती उद...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
विशुद्ध भाव अंतरी
कृती उदार यत्करी
सदैव जो असे व्रती
मदीय त्या नमस्कृती॥
न पापा यन्मना शिवे
शिवे तरी झुरे जिवे
करी सदा निजोन्नती
मदीय त्या नमस्कृती॥
परोपकार आवडे
स्तुती जयास नावडे
सुनिर्मळा सदा मती
मदीय त्या नमस्कृती॥
सदैव ईश्वरस्मृती
स्वदेशकारणी रता
तयास वर्णु मी किती
सदैव त्या नमस्कृती॥
-अमळनेर, छात्रालय १९२८
N/A
References : N/A
Last Updated : April 20, 2018
TOP