मजला तुझ्यावीण जगी नाही कोणी - मजला तुझ्यावीण जगी नाही क...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
मजला तुझ्यावीण जगी नाही कोणी ॥
अगतिक निशिदीन
मजलागि वाटे
सदा दीन या लोचनी येई पाणी ॥ मजला.... ॥
मम कार्य जगी काय
न कळे मला हाय
स्थिती तात ही होत केविलवाणी ॥ मजला.... ॥
असेल जिणे भार
वाटे मला फार
जणू देई पाठीवरी कोणी गोणी ॥ मजला.... ॥
देवा दयाळा
हतदीन बाळा
घेऊन जा ठेवि निज पूज्य चरणी ॥ मजला.... ॥
-पुणे, ऑक्टोबर १९३४
N/A
References : N/A
Last Updated : April 10, 2018
TOP