मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग| ५१९१ ते ५२०० बोधपर अभंग ४७४४ ते ४७५० ४७५१ ते ४७६० ४७६१ ते ४७७० ४७७१ ते ४७८० ४७८१ ते ४७९० ४७९१ ते ४८०० ४८०१ ते ४८१० ४८११ ते ४८२० ४८२१ ते ४८३० ४८३१ ते ४८४० ४८४१ ते ४८५० ४८५१ ते ४८६० ४८६१ ते ४८७० ४८७१ ते ४८८० ४८८१ ते ४८९० ४८९१ ते ४९०० ४९०१ ते ४९१० ४९११ ते ४९२० ४९२१ ते ४९३० ४९३१ ते ४९४० ४९४१ ते ४९५० ४९५१ ते ४९६० ४९६१ ते ४९७० ४९७१ ते ४९८० ४९८१ ते ४९९० ४९९१ ते ५००० ५००१ ते ५०१० ५०११ ते ५०२० ५०२१ ते ५०३० ५०३१ ते ५०४० ५०४१ ते ५०५० ५०५१ ते ५०६० ५०६१ ते ५०७० ५०७१ ते ५०८० ५०८१ ते ५०९० ५०९१ ते ५१०० ५१०१ ते ५११० ५१११ ते ५१२० ५१२१ ते ५१३० ५१३१ ते ५१४० ५१४१ ते ५१५० ५१५१ ते ५१६० ५१६१ ते ५१७० ५१७१ ते ५१८० ५१८१ ते ५१९० ५१९१ ते ५२०० ५२०१ ते ५२१० ५२११ ते ५२२० ५२२१ ते ५२३० ५२३१ ते ५२४० ५२४१ ते ५२५० ५२५१ ते ५२६० ५२६१ ते ५२७० ५२७१ ते ५२८० ५२८१ ते ५२९० ५२९१ ते ५३०० ५३०१ ते ५३१० ५३११ ते ५३२० ५३२१ ते ५३३० ५३३१ ते ५३४० ५३४१ ते ५३५० ५३५१ ते ५३६० ५३६१ ते ५३७० ५३७१ ते ५३८० ५३८१ ते ५३९० ५३९१ ते ५४०० ५४०१ ते ५४१० ५४११ ते ५४२० ५४२१ ते ५४३० ५४३१ ते ५४४० ५४४१ ते ५४५० ५४६१ ते ५४७० ५४७१ ते ५४८० ५४८१ ते ५४९० ५४९१ ते ५५०० ५५०१ ते ५५१० ५५११ ते ५५२० ५५२१ ते ५५२२ बोधपर अभंग - ५१९१ ते ५२०० तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत बोधपर अभंग - ५१९१ ते ५२०० Translation - भाषांतर ॥५१९१॥जिवें जित कोष्टी खांचे घातलासे । विणी सावकाशें एक चित्तें ॥१॥जोडुनियां तंतू सांधी बर्यावोजा । आवडत्या काजा संसारीच्या ॥२॥तुका ह्मणे तैसें देवापायीं चित्त । राहिलिया नित्य धन्य तोचि ॥३॥॥५१९२॥भक्तिचिया पेंठे आणियलें केणें । सांगतों हें घेणें लागे तैसें ॥१॥सुखाचे शेजारीं मांडिलें दुकान । ठेविलें सोडून आवडीये ॥२॥सुखाचें सवंग फुकाचें साचार । भरलें अपार न सरेचि ॥३॥थोर थोर मागें होते भाग्यवंत । त्यांहीं साधु संत पारखीले ॥४॥तुका ह्मणे घडी घडीनें मालाची । पाहिजे त्या रुची घेती मोलें ॥५॥॥५१९३॥जयाचे स्मरणें वारिती दुरीतें । भवसिंधू रितें होय नामें ॥१॥जन्म जया कुळी वंश वंशावळीं । तारिले सकळी नाम घेतां ॥२॥अवचट नाम स्मरे वाचे राम । तया नाहीं धाम यमाचेंही ॥३॥तुका ह्मणें त्याची कोटी कुळें जात । नित्य गात गीत वैकुंठासी ॥४॥॥५१९४॥असत्या विटाळ हा नव्हे मत्सर । सांगतों साचार आइकावें ॥१॥येऊं नका रागा शिकवणेसाठीं । उपेगाची गोष्टी पुढें आहे ॥२॥लटिक्याच सोंगें नेली सीता सतीं । कुळेंसह होती भस्म राज्य ॥३॥असत्यानें छळी पंडुचिया पुत्रां । कुंभपाकीं यात्रा दुर्योधना ॥४॥तुका म्हणे ऐसें सांगों किती मागें । बहुतां प्रसंगें दु:ख दिलें ॥५॥॥५१९५॥भाग्य पुरुषाची देखिली संपदा । आपली आपदा जाइच ना ॥१॥कुणब्याचें शेत पाहे डोळेभरी । आपलें तें घरीं अन्न नाहीं ॥२॥देह कष्टवीना ज्ञानाचा अभाव । कैसी देवराव कृपा करी ॥३॥ओळखीकारणें अर्जव करिती । तेव्हां त्याची रिती कळूं लागे ॥४॥तुका ह्मणे आशा दुराशा त्यजावी । मुक्तीची पदवी पावतसे ॥५॥॥५१९६॥सर्व देव साधा । परी अवगुण बाधा ॥१॥नव्हे ह्मणवूनि सरी । राहे एका एक दुरी ॥२॥उंस कांदा एक आळा । परी गोडीचा निराळा ॥३॥तुका ह्मणे नव्हे सरी । विष अमृताचे परी ॥४॥॥५१९७॥शुद्ध गौरवापुरतें । फळ सत्यत्व संकल्पें ॥१॥योगा कठिण त्या क्षेम । होतो वोकल्यानें श्रम ॥२॥हात पावे शिवे पाशीं । क्लेश उरत ते क्लेशीं ॥३॥तुका ह्मणे बहु आणी । खोटे निघालीया रणीं ॥४॥॥५१९८॥सर्व दुर्बळ हे जन । नारायणें विन्मुख ॥१॥हात सांडुनियां जाती । पात्र होती दंडासी ॥२॥शिदोरी ते पाप पुण्य । सवें शिण भिकेचा ॥३॥तुका ह्मणे नाहीं नाश । आह्मा म्हणविल्या दास ॥४॥॥५१९९॥सर्वा पुरे ऐसा वाण । आलें धन घरासी ॥१॥घ्यारे फुका मोलेंविण । नारायण न भुला ॥२॥ऐसा कळलियां मन । श्रोते कान सादर ॥३॥तुका ह्मणे हरी । यत्न प्रल्हादासी करी ॥४॥॥५२००॥काय नसे दैन्यवाणें । कांहीं तुमच्या कृपेनें ॥१॥हेचि तयाचि ओळखी । धाले संतोष त्या मुखीं ॥२॥वांयां जात नाहीं । प्रीतिवचन तें कांहीं ॥३॥तुका ह्मणे देवा । सत्य येतें अनुभवा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : April 03, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP