मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|बोधपर अभंग| ५३५१ ते ५३६० बोधपर अभंग ४७४४ ते ४७५० ४७५१ ते ४७६० ४७६१ ते ४७७० ४७७१ ते ४७८० ४७८१ ते ४७९० ४७९१ ते ४८०० ४८०१ ते ४८१० ४८११ ते ४८२० ४८२१ ते ४८३० ४८३१ ते ४८४० ४८४१ ते ४८५० ४८५१ ते ४८६० ४८६१ ते ४८७० ४८७१ ते ४८८० ४८८१ ते ४८९० ४८९१ ते ४९०० ४९०१ ते ४९१० ४९११ ते ४९२० ४९२१ ते ४९३० ४९३१ ते ४९४० ४९४१ ते ४९५० ४९५१ ते ४९६० ४९६१ ते ४९७० ४९७१ ते ४९८० ४९८१ ते ४९९० ४९९१ ते ५००० ५००१ ते ५०१० ५०११ ते ५०२० ५०२१ ते ५०३० ५०३१ ते ५०४० ५०४१ ते ५०५० ५०५१ ते ५०६० ५०६१ ते ५०७० ५०७१ ते ५०८० ५०८१ ते ५०९० ५०९१ ते ५१०० ५१०१ ते ५११० ५१११ ते ५१२० ५१२१ ते ५१३० ५१३१ ते ५१४० ५१४१ ते ५१५० ५१५१ ते ५१६० ५१६१ ते ५१७० ५१७१ ते ५१८० ५१८१ ते ५१९० ५१९१ ते ५२०० ५२०१ ते ५२१० ५२११ ते ५२२० ५२२१ ते ५२३० ५२३१ ते ५२४० ५२४१ ते ५२५० ५२५१ ते ५२६० ५२६१ ते ५२७० ५२७१ ते ५२८० ५२८१ ते ५२९० ५२९१ ते ५३०० ५३०१ ते ५३१० ५३११ ते ५३२० ५३२१ ते ५३३० ५३३१ ते ५३४० ५३४१ ते ५३५० ५३५१ ते ५३६० ५३६१ ते ५३७० ५३७१ ते ५३८० ५३८१ ते ५३९० ५३९१ ते ५४०० ५४०१ ते ५४१० ५४११ ते ५४२० ५४२१ ते ५४३० ५४३१ ते ५४४० ५४४१ ते ५४५० ५४६१ ते ५४७० ५४७१ ते ५४८० ५४८१ ते ५४९० ५४९१ ते ५५०० ५५०१ ते ५५१० ५५११ ते ५५२० ५५२१ ते ५५२२ बोधपर अभंग - ५३५१ ते ५३६० तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत बोधपर अभंग - ५३५१ ते ५३६० Translation - भाषांतर ॥५३५१॥हरिदासां सोपें वर्म । सर्व वर्म पाउलें ॥१॥देव कडिये घे खांदीं । क्रीडा मांडी वैष्णव ॥२॥सर्वकाळ आटाआटी । नाहीं लोटी लाभाची ॥३॥तुका म्हणे समाधान । दास मन आमुचें ॥४॥॥५३५२॥साधु सज्जनासी सदा भेटों जाय । शठ वंदी पाय नम्रपणें ॥१॥ज्याचे गिवसुनी गुणदोष पाहे । दुर्विनीत राहे तये ठायीं ॥२॥तुका ह्मणे जाण सर्व ज्याचे भाव । देवा आदि देव पांडुरंग ॥३॥॥५३५३॥शिजलियावरी जाळ । वायां जाय त्याचें मुळ ॥१॥ऐसा वारावा तो श्रम । नाहीं अतिशय काम ॥२॥सांभाळावें वर्म । काळें उचिताचा धर्म ॥३॥तुका ह्मणे कळे । ऐसा कारणाचे वेळे ॥४॥॥५३५४॥ऐसें बरें आलें मना । नारायणा या काळें ॥१॥देव आह्मा प्राणसखा । झालें दु:खा खंडण ॥२॥जन्मांतरीं पुण्यराशी । फळ त्यासी होईल ॥३॥तुका ह्मणे निज ठेवा । त्यांत हेवा लाधल्या ॥४॥॥५३५५॥बोलविशी माझ्या मुखें । परि या जनां वाटे दु:ख ॥१॥जया जयाची आवडी । तें तें तया चरफडी ॥२॥कठीण रे तो काढा । बळें रोगी मेळवी दाढा ॥३॥खाऊं नये तेंतें मागें । निवारितां रडूं लागे ॥४॥पथ्य औषधाकारणें । नेदी जेवायासी अन्न ॥५॥वैद्या भीड काय । अतिताई जिवें जाय ॥६॥तुका ह्मणे यांत । आवडे ते करी मात ॥७॥॥५३५६॥काय देतील देणार । ध्यावा एक रघुवीर ॥१॥आज दिलें उद्यां नाहीं । ऐशापाशीं मागों कायी ॥२॥ऐसें मागों विठ्ठल धुरे । देतें कल्पांतीं न सरे ॥३॥तुका ह्मणे बा अनंता । तुजवरी माझी सत्ता ॥४॥॥५३५७॥विश्वातें पाळीतां नाहीं उबगला । आमुची तयाला चिंता काय ॥१॥पाषाणाचे पोटीं वहाती दर्दुर । त्यासी तूं साचार पुरविसी ॥२॥पक्षी अजगर करिती संचिता । त्यासी तूं अनंता पुरवीसी ॥३॥तुका ह्मणे त्यावरी भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु मज ॥४॥॥५३५८॥हा तो नोहे कांहीं निराशेचा ठाव । भलें पोटीं वाव राखिलिया ॥१॥विश्वंभरें विश्व समाविलें पोटीं । तेथेंचि शेवटीं आह्मी असों ॥२॥नेणतां चिंतन करितों अंतरीं । तेथें अभ्यंतरीं उमटेल ॥३॥तुका ह्मणे माझा स्वामी अबोलणा । पुरवूं खुणे खूणा जाणतसे ॥४॥॥५३५९॥करी आतां जागें मज । ऐसें सांगतों मी तुज ॥१॥दोघे साह्य एकमेकां । होय गाऊनी हरि सखा ॥२॥नाम गोविंदाचें वाचे । घेतां मग दु:ख कैचें ॥३॥तुका ह्मणे ऐसें जेवीं । प्राण आवडतो तेवि ॥४॥॥५३६०॥ज्याचें होतांची दर्शन । नुरे भान देहींचें ॥१॥समपदीं पडे मिठी । होय तुटी संसारा ॥२॥मान दंभ अहंकार । जाय दूर पळोनी ॥३॥तुका ह्मणे शुद्ध मन । हे चरण देखतां ॥४॥ N/A References : N/A Last Updated : April 04, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP