मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|पुरंदरायण|
वाचे का न वदसी कृष्ण कृष्ण

पुरंदरायण - वाचे का न वदसी कृष्ण कृष्ण

कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..


नाम ते जपता न लागे सायास
वाचे का न वदसी कृष्ण कृष्ण ॥१॥
नरजन्मा येवोनी जिव्हा असोनी
वाचे का न वदसी कृष्ण कृष्ण ॥२॥
भान हरपूनी बोलता मधेच
वाचे का न वदसी कृष्ण कृष्ण ॥३॥
मार्गी चालताना भार वाहताना
वाचे का न वदसी कृष्ण कृष्ण ॥४॥
अस्थिर ते मन, करोनिया स्थिर
वाचे का न वदसी कृष्ण कृष्ण ॥५॥
गंध टिळा रेखिता, तांबूल सेविता
वाचे का न वदसी कृष्ण कृष्ण ॥६॥
प्रियेशी शृंगार एकांती पळभर
वाचे का न वदसी कृष्ण कृष्ण ॥७॥
धनसंपदा ती दिली ईश्वराने
वाचे का न वदसी कृष्ण कृष्ण ॥८॥
कासया परनिंद्य ठेवोनिया भान
वाचे का न वदसी कृष्ण कृष्ण ॥९॥
असार संसार सांडोनी दु:खभार
वाचे का न वदसी कृष्ण कृष्ण ॥१०॥
पापकर्माच्या राशी, तुज मुक्ती कैशी
वाचे का न वदसी कृष्ण कृष्ण ॥११॥
गरुडवाहन श्री पुरंदर विठ्ठल
वाचे का न वदसी कृष्ण कृष्ण ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP