पुरंदरायण - उच्च नीच कोण ?
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
उच्चनीच कोणी नाही जन्मजात
भोग सारे प्राप्त ते कर्मजात
नीच जातीयासी बाहेर ठेवून
देवपूजा तुझी सोवळे नेसून
नाही आत्मज्ञान भक्ती विसरून
कैसा परमार्थ, शुद्र आत्मघात
उच्चनीच कोणी नाही जन्मजात
भोग सारे प्राप्त ते कर्मजात ॥१॥
अंतरीचा कोप नव्हे का नीचजात ?
हरि विस्मरण नव्हे का नीचजात ?
तुझ्याच अंतरी वसे नीचजात
चित्त शुध्द करी व्यर्थ जातपात
मीपण ते खोटे मिटू देरे भ्रांत
श्री पुरंदर विठ्ठल माय तात
उच्चनीच कोणी नाही जन्मजात
भोग सारे प्राप्त ते कर्मजात ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP