पुरंदरायण - आनंद आज
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
आनंद आज, आनंदात दंग
श्रीपती माझा सखा पांडुरंग ॥ध्रृ॥
आज झाला माझा जन्म सार्थक
हृदयी माझ्या देवा तूच एक
उन्मन होवून दिली तुला हाक
तुझ्या दारी आलो, होवून नि:संग
श्रीपती माझा सखा पांडुरंग ॥१॥
जन्म सार्थक पूर्व संचित देवा
डोईवरी देवा, वरहस्त ठेवा
जन्मजन्मांतरी पुरेल तो ठेवा
पुरंदर विठ्ठला तुझ्या कीर्तनी दंग
श्रीपती माझा सखा पांडुरंग ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023

TOP