पुरंदरायण - कलियुग महिमा
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
सज्जनासी बहु कष्टाचा हा काळ
दुर्जनासी परि झाला हा सुकाळ ॥ध्रृ॥
अधम पापीयासी सुभिक्षकाळ
पतिव्रतेच्या निंदेचा हा काळ
कुलटा स्त्रियेसी हा चालता काळ
दांभिक, नास्तिक, याचकांचा काळ
सज्जनासी बहु कष्टाचा हा काळ
दुर्जनासी परि झाला हा सुकाळ ॥१॥
हरिभक्तांच्या क्षयाचा हा काळ
दुष्ट भार्यापुत्रांचा सुवर्ण काळ
जन्मदात्यासी बहु कष्टाचा हा काळ
सासूला छळिते सुनेचा हा काळ
सज्जनासी बहु कष्टाचा हा काळ
दुर्जनासी परि झाला हा सुकाळ ॥२॥
राजा तशी प्रजा हा अधर्म काळ
धर्माचे निर्मुलन करी हा काळ
थैमान ठायी ठायी घाली हा कलिकाळ
पुरंदर विठ्ठल, विस्मरण काळ
सज्जनासी बहु कष्टाचा हा काळ
दुर्जनासी परि झाला हा सुकाळ ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP