पुरंदरायण - अपूर्व व्यापार
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
ऐसा अपूर्व केला व्यापार
रोखीचा व्यवहार नाही उधार ॥ध्रृ॥
हरिचरण वस्त्र, पागोटे गुरुचरण
हरिदासांचे दर्शन झालो पावन
परमपापी कली आणिक दुर्जन
भय कासया सुटला संसार
ऐसा अपूर्व केला व्यापार
रोखीचा व्यवहार नाही उधार ॥१॥
धवल कागद हृदयी करुनी
जिव्हेची केली मग लेखणी
श्री हरिनामाची शाई करुनी
सारा जमाखर्च प्रभूसी सादर ऐसा अपूर्व केला व्यापार
रोखीचा व्यवहार नाही उधार ॥२॥
आनंद रोमांच अक्षर अक्षर
रोख हरीभक्ती नाही उधार
हरिनाम धन आम्हा अपरंपार
माधुकरी वृत्ती आनंद अपार
ऐसा अपूर्व केला व्यापार
रोखीचा व्यवहार नाही उधार ॥३॥
मूर्ख दुर्जनांची करुनी चाकरी
नाहीच गिळली कधी भाकरी
श्री पुरंदर विठ्ठल भार तयावरी
असा अपूर्व केला व्यापार
ऐसा अपूर्व केला व्यापार
रोखीचा व्यवहार नाही उधार ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP