मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|पुरंदरायण|
हनुमान स्तुती

पुरंदरायण - हनुमान स्तुती

कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..


पवमान पवमान हनुमान जगतप्राणा । बलवाना
भवभय लंकादहना ऽऽऽ पवना ।
श्रवण कीर्तन नवविध भक्ती ।
तवचरणी दे मजसी मुक्ती । कविजन प्रिया
पवमान पवमान... ॥ध्रृ॥

हेमकौपिन उपवित शोभित मारुत कामदोष रहिता ।
व्योम सकल चराचर व्यापित निर्भय निज रामदूता
हीन दीन मी तर पामर, या दासासी शक्ती दे
दावुनी मजसी मुक्तिमार्ग तू, सतत तुझ्यापदि भक्ती दे
पवमान पवमान....॥१॥

वज्र शरीर, गंभीर, मुकुट गदाधर, दुर्जनस्तव कुठारा ।
निर्बलस्तव अतिदया अपार उदारा, सज्जन क्लेश परिहारा
अर्जुन रथध्वजी विराजमान तू, भु:भु:कार तो त्रिलोक डळमळे
पदोपदी तुझी अब्ज पायधुळी, मार्जन केल्या भवभय मुक्ती
पवमान पवमान.... ॥२॥
प्राण अपान उदान-व्यान समाना, आनंद भारती रमणा
सकलशास्त्र प्रविण आदिज्ञाना, दयाधन अंजनीसूता
तुजविण मजसी त्राता नाही, सर्वकर्म ही तुझीया पायी
प्राणनाथ विजय विठ्ठला, दावी तू मजसी भानुप्रकाशा
पवमान पवमान.... ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP