पुरंदरायण - नाही भरवसा देवा तुजवर
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
नाही भरवसा देवा तुजवर ॥ध्रृ॥
कसा म्हणू रे, तुज करुणाकर
युगायुगांचे हे जनन मरण
उदरी मातेच्या दु:ख ते दारुण
भव भय क्लेश देवा तू कारण
मायेचा खेळ देवा, देहनश्वर
नाही भरवसा देवा तुजवर ..... ॥१॥
बळी ध्रुवावरी देवा दया केली
शिळा ती अहिल्या तिज उध्दरीली
पापी अजामिळ तया मुक्ती दिली
लीन पापकर्मी, सदा मी निरंतर
नाही भरवसा देवा तुजवर ......॥२॥
रंगलो गांजलो देवा, काय जाहले
करुणाकर तू, ब्रिद राख आपुले
पुरंदर विठ्ठला, दावी तुझी पाऊले
तूची मायतात, दयेचा सागर
नाही भरवसा देवा तुजवर ......॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP