मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|पुरंदरायण|
भाग्य लक्ष्मी ये आई

पुरंदरायण - भाग्य लक्ष्मी ये आई

कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..


भाग्य लक्ष्मी ये आई येई येई । सौभाग्य लक्ष्मी ये आई ॥ध्रृ॥
ऋणु झुणु, ऋणु झुणुपदि घुंगरु । गजगामिनी सुकुमारी येई
सज्जन साधू पूजेसमयी । तक्रामधुनी नवनीतासम
भाग्य लक्ष्मी ये आई येई येई । सौभाग्य लक्ष्मी ये आई ॥१॥
सुवर्ण रत्ने उधळित ये ग । मनुजाला तू सिध्दी दे ग
दिनकर कोटी तेजस्विनी तू । जनककुमारी वेगे
भाग्य लक्ष्मी ये आई येई येई । सौभाग्य लक्ष्मी ये आई ॥२॥
अन्य नको, भक्त गृही ये । नित्य शुभंकर नित्य सुमंगल
सत्यचे वदती साधू सज्जन । हृदयी त्यांच्या तुझीच वसती
भाग्य लक्ष्मी ये आई येई येई । सौभाग्य लक्ष्मी ये आई ॥३॥
असंख्य इतुके भाग्य देवूनी । कंकणभर मिरवित ये ग
कुंकुमांकित कमललोचन । व्यंकटरमण प्रियतम राणी
भाग्य लक्ष्मी ये आई येई येई । सौभाग्य लक्ष्मी ये आई ॥४॥
सौख्यसंपदा, भरुनी वाहू दे । शुक्रवारी पुजेसमयी
परम दयाघन देवकीनंदन । निर्मल पुरंदर विठ्ठलराणी
भाग्य लक्ष्मी ये आई येई येई । सौभाग्य लक्ष्मी ये आई ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP