मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|पुरंदरायण|
नको देवा मज तुझे उपकार

पुरंदरायण - नको देवा मज तुझे उपकार

कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..


नको देवा मज तुझे उपकार
बळ एक मज तुझे नाम ॥ध्रृ॥
गजेंद्राकारणे आलासी धावून
तयासी कारण आदिमूल नाम ॥१॥
पिता अरि होता प्रल्हादासी
संकटी रक्षिले नरहरीनाम ॥२॥
द्रौपदीची वस्त्रे फेडिता सभेत
लठ्ठी राखी कृष्ण कृष्ण नाम ॥३॥
अजामिळापुढे उभे यमदूत
यमास रोखिले नारायण नाम ॥४॥
अज्ञ कपिकूळ तया उध्दरीले
तव सत्य राम राम नाम ॥५॥
भक्त ध्रुवबाळ वनामाजी येता
रक्षिले तयासी वासुदेव नाम ॥६॥
जळिस्थळि तूची पुरंदरविठ्ठला
किती वर्णू आता देवा तुझे नाम ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP