पुरंदरायण - हेची भाग्य मज
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
हेची भाग्य मज । देवा आता द्यावे ॥ध्रृ॥
कठीण भक्तामाजी । शीळेसम व्हावे
हरीस्मरण परी । अंतरी करावे
निर्मळ भक्तासी । मधुर बोलावे
हेची भाग्य मज । देवा आता द्यावे ॥१॥
मनात आपुल्या । मंथन करावे
मुनियोगियांच्या । प्रेमापात्र व्हावे
परमार्थ सागरी । मीन तूचि व्हावे
भक्तिचे भोजन । आनंदे करावे
हेची भाग्य मज । देवा आता द्यावे ॥२॥
विषयभोग ते । तृणसम मानावे
पावक होवून । तू सामोरे जावे
शीतल होवून । हरीसी भजावे
श्री पुरंदर विठ्ठला । शरण जावे
हेची भाग्य मज । देवा आता द्यावे ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP