पुरंदरायण - अगा मायबापा पुरंदर विठ्ठला
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
अगा मायबापा पुरंदर विठ्ठला
का दूर लोटतोस भक्तवत्सला ॥धृ॥
गजेंद्राकारणे धाव घेतलासी
प्रल्हादाकारणे स्तंभी प्रकटसी
शिळा ती अहिल्या तिज उध्दरसी
देवा काय मीच अपराध केला
अगा मायबापा पुरंदर विठ्ठला ॥१॥
द्रौपदीची लाज तूच राखलीस
अढळ केलेस बालक ध्रुवास
पापी अजामिळ, दया दावलीस
देवा मजसी का धरिला अबोला
अगा मायबापा पुरंदर विठ्ठला ॥२॥
मायबाप तूच म्हणे दयाघना
का केलीस माझी निष्ठूर वंचना
कारे तुज शोभे भक्त प्रतारणा
तुझ्या भेटीलागी श्वास हा थांबला
अगा मायबापा पुरंदर विठ्ठला ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP