पुरंदरायण - सुलभ भक्ती
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
जीव धावतो श्रमतो दीडवितीच्या पोटामागून
ऐक सांगतो तुला, भक्तीचे सुलभ साधन ॥धृ०॥
नाही तुज बळ, नको भजन पूजन
म्हण देवा अर्पण, दोन नेत्रींचे निरांजन
वस्त्र देहीचे तुझ्या, ते प्रभूसी समर्पण
प्रदक्षिणा रे तीच, नित्य चालते भ्रमण
जीव धावतो श्रमतो .......... ॥१॥
पांडुरंग जप तोच, तुझे मनन चिंतन
परम भागवत, ते शेजारी दोहो बाजून
सतिसुत आप्तजन ते हरीचे भक्तजन
भूवैकुंठ तू जाण, तुझे घर अंगण
जीव धावतो श्रमतो .......... ॥२॥
क्षण क्षण दिनरात, का रे विनाकारण
आयुष्य चालले वाया, जिवा घेई रे जाणून
तुझे सारे विहित कर्म, प्रभूसी अर्पून
दिसामाजी एकदाच, पुरंदर विठ्ठल स्मरण
जीव धावतो श्रमतो .......... ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2023
TOP