पुरंदरायण - कुल कोठोनी आले
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
कुल कुल म्हणोनी कलकल कासया
कुल कोठोनी आले साधू सज्जना ॥ध्रृ॥
चिखलामाजी कमळ, निर्मल का असते
लक्ष्मी करी वास, नारायण हाती शोभते ॥१॥
धेनुमासांतूनी उत्पन्न क्षीर शुध्द का होते
सुर-असूर द्विज अवघ्यांनी प्रिय असते ॥२॥
मृगदेहातुनी कस्तुरी पावन कैसी होते
द्विजांच्या भाली गंध कस्तुरी शोभते ॥३॥
अनादि अनंत कुल त्यांचे कोणते
कुल आत्म्याचे कुल जीवाचे कोणते ॥४॥
तत्व पंचेंद्रिय कुल त्यांचे कोणते
पंचमहाभूत कुल त्यांचे कोणते ॥५॥
नको आता व्यर्थ होड वादविवाद
मज पुरे एक आदिकेशव नाम ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP