भाग्य तुझे थोर, सुकुमारी समुद्रकुमारी
त्रैलोक्य अधिपती, तुझा ग पती श्रीहरी ॥धृ०॥
सूर-असूर सकल चराचर तुझे किंकर
हरिचरण सेवा करी, तुझे कोमल कर
पूर्ण गुण नारायण, तुझ्या हृदयी निरंतर
अन्नवसन संपदादायिनी दया करी
भाग्य तुझे थोर, सुकुमारी समुद्रकुमारी
त्रैलोक्य अधिपती, तुजा ग पती श्रीहरी ॥१॥
परि परि रुप छत्र, चामर, अलंकार
तुझे गुण वर्णती सुस्वर नारद, तुंबर
हरी सगुण निर्गुण, भासे तो निराकार
अणु रेणु व्याप्त, अनादि अनंत गिरीधारी
भाग्य तुझे थोर, सुकुमारी समुद्रकुमारी
त्रैलोक्य अधिपती, तुजा ग पती श्रीहरी ॥२॥
पद्मा, पद्मजा, पद्मालया, पद्मलोचने
तवपदी अर्पिली ही भावभक्ति सुमने
सकलांचे मनोरथ पूर्ण करी शुभानने
पुरंदर विठ्ठल प्रियतमे पावे झडकरी
भाग्य तुझे थोर, सुकुमारी समुद्रकुमारी
त्रैलोक्य अधिपती, तुजा ग पती श्रीहरी ॥३॥