प्रभात झाली, उठ गिरीषा, उठी उठी श्रीनिवासा
उठी उठी श्रीनिवासा ॥ध्रृ॥
पूर्व दिशेहून, अरुण निघाला, तुझ्या दर्शनाला
मुनिजन येती, पहा तयांचा, वेदघोष चालला
आतूर झाले, तव दर्शना, पहा लोकपाला
स्वीकारावे, धूलीदर्शन, देवा सप्तगिरी निवासा
उठी उठी श्रीनिवासा ॥१॥
बकुळ, चंपक, कमळ, केतकी गंधही दरवळला
तवपूजेस्तव, धूप, दीप, नैवेद्यही आणिला
लक्ष्मीरमणा, गोविंदा गातची, समुह एक आला
व्याकुळ भक्ता, द्यावे दर्शन श्री गिरी व्यंकटेशा
उठी उठी श्रीनिवासा ॥२॥
सूर-असूरही आले, आले गरुड हनुमंत
सुस्वर गायन, करिती नारद, मुग्ध आसमंत
पुरंदर विठ्ठला, दास रंगला, तुझ्या कीर्तनात
द्यावे दर्शन, वेगे आता, देवा तिरुमलेशा
उठी उठी श्रीनिवासा ॥३॥