पुरंदरायण - नश्वर हा देह
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
नश्वर हा देह, कासया अभिमान ॥ध्रृ॥
अग्निमाजी जळतो, सडतो नासतो
भोग घेवोनिया, हा पतन पावतो
व्याधी, नानाविध, अंती जर्जर होतो
ऐशा या देहाला, कुठरा रे सन्मान
नश्वर हा देह, कासया अभिमान ॥१॥
भोवती विटाळ तो मातेच्या उदरी
घाणीचे आगर ते मल नवद्वारी
नरक यातना भोगतो परोपरी
पुरंदर विठ्ठल एका दयानिधान
नश्वर हा देह, कासया अभिमान ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP