पुरंदरायण - नाही सांडिले अवगुणा
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
नाही सांडिले अवगुणा ॥ध्रृ॥
सर्वज्ञ जगी म्हणविसी
नाही सांडिले अवगुणा
हरीकथा ती ऐकूनिया
कुबुध्दी काही जाईना
नाही सांडिले अवगुणा ॥१॥
काषायवस्त्र जरी ल्याला
मनी वसे कामवासना
व्रत, नियम, आचरण
परी क्रोध काही जाईना
नाही सांडिले अवगुणा ॥२॥
नाही आत्मपरोक्षज्ञान
कुमती ही तुझी जाईना
गुरुभक्ती ती परोपरी
तो गुरु काही आकलेना
नाही सांडिले अवगुणा ॥३॥
केले जरी तू तीर्थाटन
देव कोठे तो भेटिचिना
ब्रह्मज्ञानी तूचि झालासी जरी
नाही त्यागिले अभिमाना
नाही सांडिले अवगुणा ॥४॥
यज्ञयाग ते नानापरी
ना सांडिले असत्यवचना
चरण पुरंदर विठ्ठलाचे
अधमा तुज गवसेना
नाही सांडिले अवगुणा ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP