पुरंदरायण - जैशासी तैसे केलेस देवा
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
जैशासी तैसे केलेस देवा
यावे साहाया देवाधिदेवा पंढरीराया ॥ध्रृ॥
मागितले जल बालक समजून
तूची आलासी बालक होवून
जलही दिलेस देवा गडू भरुन
सांजवेळ अधू नेत्र कोपली काया
यावे साहाया देवाधिदेवा पंढरीराया ॥१॥
घोर तो अपराध देवा मी केला
घेवून काठी मी ताडिले तुजला
अनाथरक्षका सूड तू घेतला
नाही उपजली देवा तुला रे दया
याचे साहाया देवाधिदेवा पंढरीराया ॥२॥
देवा माझे रुप तू कारे घेतले
वेश्येघरी जावून कंकण का दिधले
मज वेश्यागामी चोर का ठरविले
कपटनाटकी तू तुझीच ही माया
यावे साहाया देवाधिदेवा पंढरीराया ॥३॥
देवा मज मारिताती खांबी बांधून
म्हणे भक्तवत्सल होई भक्ताआधीन
पुरंदर विठ्ठला देई दुजे कंकण
नको देवा आता वेळ दवडू वाया
यावे साहाया देवाधिदेवा पंढरीराया ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP