पुरंदरायण - ऋण
कन्नड संतकवी हरिदास पुरंदरदास ह्यांचे जीवन दर्शन..
ऋण कदापी घातक
ऋण जिवासी बाधक
ऋण म्हणजे सूतक
मज करी ऋणमुक्त ॥१॥
दारी येती दुष्टजन
जाती निष्ठुर बोलून
नानापरी अवमान
गेला अवघा सन्मान ॥२॥
गृही छळे सतिसूत
जगणे से भयभीत
जैसा मृत्यूच साक्षात
ते ॠण नावाचे भूत ॥३॥
आप्त मेल्यावरी शोक
दहा दिसांचे सुतक
ऋण नावाचे सूतक
गतजन्मीचे पातक ॥४॥
ऋण मज आकलेना
कैसे फेडू उमजेना
मुक्त करी नारायणा
पुरंदर विठ्ठल दयाघना ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2023
TOP