तूं मज आवडतो । बहुभारी । येती प्रेमाच्या लहरी तूं० ॥धृ०॥
अंतरींचा हरी तूं । अव्यक्त । बाहेर झाला व्यक्त । तूं मज आवडतो० ॥१॥
हृदयींचा मम तूं । प्राणसखा । बाहेर पाठीराखा । तूं मज आवडतो० ॥२॥
अंतरीं कूटस्थ निर्गुण । बाहेर सुंदर सगुण । तूं मज आवडतो० ॥३॥
अंतर बाहेर एक हरी । व्यापक चराचरीं । तूं मज आवडतो० ॥४॥
वारी आणि हरी । भेद नाही । स्वरुपीं एकची होई । तूं मज आवडतो० ॥५॥