मुक्तची मी होणार ॥ देही या० ॥ मुक्तची मी होणार० ॥धृ०॥
इच्छा वासना सर्व सोडुनी । लीन सद्गुरुपदीं होउनी ।
स्वानंदची घेणार ॥ देहीं या० ॥ मुक्तची० ॥१॥
देहबुद्धि ही समूळ टाकुनी । आत्मबुद्धिचा विचार करुनी ।
ब्रम्हरुप होणार ॥देहीं या० ॥ मुक्तची० ॥२॥
नामस्मरणीं रत होउनी । भजनानंदांतचि रंगुनी ।
ब्रम्हरस पीणार ॥ देहीं या० ॥ मुक्तची० ॥३॥
सद्गुरुकृपा संपादुनी । सत्चितरुप तें सर्व जाणुनी ।
वारी लीन होणार ॥ देहीं या० ॥ मुक्तची० ॥४॥